Ranveer Deepika Baby: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी अखेर त्यांची लाडकी लेक ‘दुआ’ चा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. गेल्या वर्षी 8 सप्टेंबर 2024 रोजी दीपिकाने मुलीला जन्म दिला होता. गेल्या वर्षभरापासून कॅमेऱ्यांपासून दूर ठेवलेल्या या चिमुकलीचा पहिला फोटो त्यांनी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रणवीर-दीपिकाची लेक नेमकी कोणासारखी दिसते, याबद्दल गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करत ‘दुआ हुबेहूब दीपिकासारखी दिसते,’ असे म्हटले आहे.
आई-लेकीचे खास ट्विनिंग
दीपिका आणि रणवीरने शेअर केलेल्या या कुटुंबाच्या फोटोंमध्ये तिघांनीही खास पारंपरिक लूक केल्याचे दिसत आहे.
दीपिकाने लाडक्या लेकीसोबत ट्विनिंग केले आहे. आईने लाल रंगाचा सुंदर पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे, तर बेबी दुआही लाल रंगाच्या गोंडस कपड्यांमध्ये, छोटीशी टिकली आणि हेअरस्टाईलमध्ये खूप गोड दिसत आहे.
रणवीर सिंगने मायलेकींना कॉन्ट्रास्ट मॅचिंग होईल अशी ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली आहे. एका फोटोत रणवीर आपल्या लेकीला मोठ्या प्रेमळ नजरेने पाहत असल्याचे दिसत आहे.
नाव आणि प्रार्थनेचा फोटो
गेल्या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव ‘दुआ’ ठेवल्याचे जाहीर केले होते. दुआ म्हणजे ‘प्रार्थना’ असा अर्थही दीपिकाने सांगितला होता. यंदा शेअर केलेल्या 5 फोटोंपैकी शेवटच्या फोटोत चिमुकली दुआ आईच्या मांडीवर बसून प्रार्थनेसाठी हात जोडताना दिसत आहे, जो क्षण चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.
या फोटोंना ‘दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ’ असे कॅप्शन देत या जोडप्याने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, दुआच्या जन्मानंतर दीपिकाने इंडस्ट्रीमधून काही महिन्यांसाठी ब्रेक घेतला होता. लेकीला वेळ देणे हे आता आपले पहिले प्राधान्य असेल, असे तिने काही मुलाखतींमध्ये स्पष्ट केले होते. सप्टेंबरमध्ये दुआने तिचा पहिला वाढदिवस साजरा केला.
हे देखील वाचा – दिवाळीत धमाका! आयुष्मान-रश्मिकाच्या ‘थामा’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस गाजवले; पाहा कमाईचा आकडा