Home / मनोरंजन / Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! आता सीक्वलची अधिकृत घोषणा; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘धुरंधर 2’

Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! आता सीक्वलची अधिकृत घोषणा; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘धुरंधर 2’

Dhurandhar 2 Release Date : भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. केवळ हिंदी भाषेत...

By: Team Navakal
Dhurandhar 2
Social + WhatsApp CTA

Dhurandhar 2 Release Date : भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. केवळ हिंदी भाषेत प्रदर्शित होऊनही या चित्रपटाने दक्षिण भारतात आणि जागतिक स्तरावर अभूतपूर्व यश मिळवले आहे.

प्रेक्षकांचा हा वाढता प्रतिसाद आणि दक्षिणेकडील राज्यांमधून होत असलेली मागणी लक्षात घेऊन निर्मात्यांनी आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ‘धुरंधर २’ ची अधिकृत घोषणा केली आहे.

ईद २०२६ ला होणार भव्य प्रदर्शन

निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर २’ हा १९ मार्च २०२६ रोजी ईदच्या मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर धडकणार आहे. विशेष म्हणजे, पहिला भाग फक्त हिंदीत असताना, दुसरा भाग हिंदीसह तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण ५ भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित केला जाणार आहे.

दक्षिणेतील वितरक आणि चित्रपटगृह मालकांनी प्रादेशिक भाषांमधील डबिंगसाठी आग्रही मागणी केली होती, ज्याची दखल आता निर्मात्यांनी घेतली आहे.

मोठ्या पडद्यावरचा जबरदस्त थरार

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आदित्य धर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. ‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘बी ६२ स्टुडिओज’ यांची निर्मिती असलेला हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा अधिक भव्य आणि अ‍ॅक्शनने परिपूर्ण असणार आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शचे काम वेगाने सुरू आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही, तर परदेशातील बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्याची योजना आखली जात आहे.

पॅन इंडिया स्तरावर विस्तार

‘धुरंधर’च्या पहिल्या भागाने सोशल मीडिया आणि प्रेक्षकांच्या सकारात्मक माऊथ पब्लिसिटीमुळे दक्षिण भारतात मोठी कमाई केली होती. आता ‘धुरंधर २’ च्या माध्यमातून हा चित्रपट खऱ्या अर्थाने पॅन इंडिया चित्रपट म्हणून समोर येणार आहे. २०२६ सालातील हा सर्वात मोठा आणि बहुप्रतिक्षित भारतीय चित्रपट ठरेल, अशी चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.

हे देखील वाचा –  Devrai Fire : ‘घरावर बॉम्ब पडल्यासारखी अवस्था…’; सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईला भीषण आग; अभिनेत्याने प्रशासनाला झापले

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या