Home / मनोरंजन / Akshaye Khanna: ‘दृश्यम 3’ मधून अक्षय खन्नाची हकालपट्टी! निर्मात्याचा संताप अन् कायदेशीर नोटीस; ‘हा’ दमदार अभिनेता घेणार जागा

Akshaye Khanna: ‘दृश्यम 3’ मधून अक्षय खन्नाची हकालपट्टी! निर्मात्याचा संताप अन् कायदेशीर नोटीस; ‘हा’ दमदार अभिनेता घेणार जागा

Drishyam 3 Akshaye Khanna Controversy : धुरंधर चित्रपटामुळे अक्षय खन्ना सध्या चर्चेत आहे. मात्र, आता तो मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता...

By: Team Navakal
Akshaye Khanna
Social + WhatsApp CTA

Drishyam 3 Akshaye Khanna Controversy : धुरंधर चित्रपटामुळे अक्षय खन्ना सध्या चर्चेत आहे. मात्र, आता तो मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘दृश्यम 3’ चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नावर गंभीर आरोप करत त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

चित्रपट सुरू होण्याच्या अवघ्या 10 दिवस आधी अक्षयने या प्रोजेक्टमधून माघार घेतल्याने निर्माते संतापले असून त्यांनी आता त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची निवड केली आहे.

काय आहे वादाचे मुख्य कारण?

निर्माते कुमार मंगत पाठक यांच्या मते, अक्षय खन्नाने रीतसर करार केला होता आणि त्यासाठी आगाऊ मानधनही घेतले होते. मात्र, शूटिंग सुरू होण्यापूर्वी त्याने अचानक असहकार्य करण्यास सुरुवात केली. चित्रपटाच्या कथेनुसार त्याला विग न वापरता नैसर्गिक लूक द्यायचा होता, ज्याला त्याने आधी संमती दिली होती.

परंतु, नंतर त्याने आपला निर्णय बदलला आणि निर्मात्यांशी संवाद साधणे बंद केले. ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षयने फोन आणि मेसेजला उत्तरे देणे टाळले, ज्यामुळे निर्मात्यांना कायदेशीर पाऊल उचलावे लागले.

जयदीप अहलावतची धमाकेदार एन्ट्री

अक्षय खन्नाच्या या वागणुकीनंतर निर्मात्यांनी तातडीने ‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावतला चित्रपटात घेतले आहे. कुमार मंगत यांनी सांगितले की, “जयदीप हा एक प्रगल्भ अभिनेता आणि अतिशय चांगला माणूस आहे. त्याच्या येण्याने चित्रपटाचे काम आता पुन्हा रुळावर आले आहे. आम्ही त्याच्या भूमिकेत काही खास बदल केले आहेत, जे प्रेक्षकांसाठी सुखद धक्का असतील.”

अक्षयने ऐनवेळी चित्रपट सोडल्यामुळे जे आर्थिक नुकसान झाले, त्यासाठी आता कोर्टात नुकसान भरपाई मागितली जाणार आहे.

निर्मात्यांनी व्यक्त केला जुना अनुभव

अक्षय खन्नाच्या वागण्यावर आश्चर्य व्यक्त करताना पाठक म्हणाले की, “जेव्हा मी त्याला ‘सेक्शन 375’ आणि ‘दृश्यम’ मध्ये कास्ट केले, तेव्हा तो जवळजवळ 4 वर्षे कामाच्या प्रतीक्षेत होता. मी त्याला संधी दिली आणि त्याच्यासाठी भूमिका लिहिल्या जातील असा विश्वास दिला होता. मात्र, यश मिळाल्यावर त्याने दाखवलेली ही अव्यावसायिक वृत्ती अनाकलनीय आहे.” या सर्व वादात आता जयदीप अहलावत आणि अजय देवगण ही जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दरम्यान, अक्षय खन्नाचा गाजलेला चित्रपट ‘धुरंधर 2’ येत्या 19 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा –  विसरून जाल स्प्लेंडर आणि प्लॅटिना! Honda Shine 100 मध्ये मिळतात पॉवरफुल फीचर्स; जाणून घ्या का आहे ही गाडी खास?

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या