Raj Kundra Bitcoin: ईडीने (ED) बिटकॉइन (Bitcoin) घोटाळ्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) विरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की, कुंद्रा फक्त व्यवहारातील मध्यस्थ नव्हते तर लाभार्थी मालक होते. कुंद्रा यांच्या ताब्यात २८५ बिटकॉइन आहेत ज्याची सध्याची किंमत १५०.४७ कोटी रुपये आहे. हे बिटकॉइन कुंद्रा यांना दिवंगत मास्टरमाइंड अमित भारद्वाज कडून प्राप्त झाले होते.
आरोपपत्रात असेही नमूद आहे की, कुंद्रा यांनी जाणूनबुजून बिटकॉइन वॉलेटचे पत्ते आणि इतर महत्त्वाचे पुरावे लपवले तसेच भारद्वाज कडून मिळालेले बिटकॉइन जमा केले नाहीत. ईडीने असा दावा केला आहे की, कुंद्रा यांच्याकडे गुन्ह्यातून मिळालेल्या या संपत्तीवर (बिटकॉइन) ताबा होता आणि त्यांनी त्याचा वापर सुरू ठेवला. याशिवाय, ईडीने म्हटले आहे की, त्यांनी गुन्हेगारी मार्गातून मिळालेल्या पैशांचा स्रोत लपवण्यासाठी त्याचा कमी किंमतीत व्यवहार केला . त्यांची पत्नी अभिनेत्री पत्नी शिल्पा शेट्टीही यात सहभागी होती.
हे देखील वाचा –
डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून २९ चमचे, पेन , टुथब्रश काढले
येऊर जंगलातील बेकायदेशीर टर्फवर महापालिकेची कारवाई
मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही ! संभाजी ब्रिगेडचा इशारा