Home / मनोरंजन / Miss Universe : मिस मेक्सिको फतिमा बॉश मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती! ‘डंब’ म्हणाऱ्यांना दिले उत्तर

Miss Universe : मिस मेक्सिको फतिमा बॉश मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती! ‘डंब’ म्हणाऱ्यांना दिले उत्तर

Miss Universe Fatima Bosch : मिस मेक्सिको फतिमा बॉश (Fátima Bosch) हिने मिस युनिव्हर्स 2025 चा प्रतिष्ठेचा किताब आपल्या नावावर...

By: Team Navakal
Miss Universe Fatima Bosch
Social + WhatsApp CTA

Miss Universe Fatima Bosch : मिस मेक्सिको फतिमा बॉश (Fátima Bosch) हिने मिस युनिव्हर्स 2025 चा प्रतिष्ठेचा किताब आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे थायलंडचे दिग्दर्शक नवाट इत्सारग्रिसील यांनी एका लाईव्ह कार्यक्रमात तिला ‘डंब’ म्हटले होते, ज्यामुळे फतिमा बॉश वादात सापडली होती.

या टीकेला उत्तर देत तिने थेट विश्वसुंदरीचा (Miss Universe) ताज जिंकून दाखवला. यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा 21 नोव्हेंबर 2025 रोजी थायलंडमधील पाक क्रेट येथे पार पडली. भारताचे प्रतिनिधित्व करणारी मनिका विश्वकर्मा हिने टॉप 30 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले, पण भारतासाठी चौथा मिस युनिव्हर्सचा ताज आणण्यात ती अपयशी ठरली.

फतिमा बॉशसह टॉप 5 स्पर्धक

मेक्सिकोच्या फतिमा बॉशला विजेते घोषित करण्यात आले.

  • विजेती (Winner): मेक्सिको – फतिमा बॉश
  • 1st Runner-up: थायलंड – प्रविणार सिंग (Praveenar Singh)
  • 2nd Runner-up: व्हेनेझुएला – स्टेफनी अबासाली (Stephany Abasali)
  • 3rd Runner-up: फिलिपिन्स – अहतिसा मनालो (Ahtisa Manalo)
  • 4th Runner-up: कोट डी’आयव्होर – ऑलिव्हिया यासे (Olivia Yacé)

टॉप 12 मध्ये मनिका विश्वकर्मा अपयशी

मनिका विश्वकर्मा टॉप 30 मध्ये असूनही टॉप 12 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवू शकली नाही आणि तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. ज्युरींनी स्विमसूट राउंडनंतर टॉप 12 फायनलिस्ट निवडले, ज्यात चिली, कोलंबिया, क्युबा, ग्वाडेलोप, मेक्सिको, पोर्टो रिको, व्हेनेझुएला, चीन, थायलंड, फिलिपिन्स, माल्टा आणि कोट डी’आयव्होर येथील स्पर्धकांचा समावेश होता.

स्पर्धेवर वादाचे सावट

या वर्षीच्या सौंदर्य स्पर्धेची थीम ‘द पॉवर ऑफ लव्ह’ अशी होती. परीक्षक मंडळात सायना नेहवाल, नताली ग्लीबोवा आणि लुई हेरेडिया यांचा समावेश होता. मात्र, निकाल फिक्स आणि हितसंबंधांच्या संघर्षाच्या आरोपामुळे 3 परीक्षकांना राजीनामा द्यावा लागला, ज्यामुळे स्पर्धेला वादाचे गालबोट लागले.

दरम्यान, मिस युनिव्हर्स 2026 ही स्पर्धा पोर्टो रिकोमध्ये आयोजित केली जाईल आणि ती या स्पर्धेची 75 वी आवृत्ती असेल.

हे देखील वाचा – Tesla Model Y किती सुरक्षित? क्रॅश टेस्टमधून समोर आली माहिती

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या