Aabeer Gulaal Movie India release: पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री वाणी कपूर यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अबीर गुलाल’ जगभरात प्रदर्शित झाला आहे, मात्र तो भारतात अद्याप रिलीज झालेला नाही. रिपोर्टनुसार, आता हा चित्रपट 26 सप्टेंबरला भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
फवाद खान 2016 मधील उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आल्यापासून बॉलिवूडपासून दूर आहे. तसेच, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी विरोधातील आवाज अधिकच वाढला आहे. फवाद खानने भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ ला ‘लाजिरवाणा हल्ला’ म्हटले होते.
त्यामुळे आता जवळपास 9 वर्षांनंतर तो या चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या रिलीजला भारतात मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार, निर्मात्यांकडून किंवा कलाकारांकडून अबीर गुलालच्या भारतातील रिलीजबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, हा चित्रपट 26 सप्टेंबरला रिलीज केला जाण्याची शक्यता आहे.
जर हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला, तर एका बाजूला फवाद खानचे चाहते आनंदी असतील. मात्र, दुसऱ्या बाजूला त्याच्या वादग्रस्त विधानामुळे त्याला मोठा विरोधही होऊ शकतो.
हे देखील वाचा – सुशीला कार्की ठरल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान; Gen Z ने Discord वरून केली निवड; हा प्लॅटफॉर्म नक्की काय आहे?