Harry Potter TV series Cast | HBO च्या बहुप्रतीक्षित ‘हॅरी पॉटर’ (Harry Potter TV series) मालिकेसाठी अखेर मुख्य कलाकारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 30,000 हून अधिक मुलांनी दिलेल्या ऑडिशननंतर हॅरी, हरमायनी आणि रॉन यांच्या भूमिकांसाठी कलाकारांची निवड करण्यात आली. ही नवीन मालिका जे के रॉलिंग यांच्या प्रसिद्ध पुस्तकांवर आधारित असणार आहे.
हॅरी, हरमायनी आणि रॉन कोण साकारणार?
HBO च्या अधिकृत घोषणेनुसार, डोमिनिक मॅकलॉघलिन (Dominic McLaughlin) हॅरी पॉटरची (Harry Potter) भूमिका साकारणार आहे. हरमायनी ग्रेंजरसाठी अॅरबेला स्टँटनची (Arabella Stanton) निवड झाली असून रॉन वेस्लीच्या (Ron Weasley) भूमिकेसाठी अॅलेस्टर स्टाउट निवडले गेले आहेत.
या पात्रांच्या मूळ भूमिका डॅनियल रॅडक्लिफ, एम्मा वॉटसन आणि रूपर्ट ग्रिंट यांनी साकारल्या होत्या होत्या. आता या नव्या कलाकारांना ‘Golden Trio’ म्हणून सादर करण्यात येणार असून, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कार्यकारी निर्माते फ्रान्सिस्का गार्डिनर आणि मार्क मायलोड यांनी स्पष्ट केले की, या तिघांची निवड “हजारो” ऑडिशनमधून करण्यात आली आहे. कास्टिंग दिग्दर्शक लुसी बेव्हन आणि एमिली ब्रॉकमन यांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर 2024 मध्ये ही प्रक्रिया सुरू झाली होती.
स्कॉटिश अभिनेता मॅकलॉघलिन विनोदी मालिका ‘Grow’ मध्ये झळकणार आहे. तसेच तो ‘Gifted’ या सीरिजमध्येही दिसणार आहे. अॅरबेला स्टँटनने ‘Matilda: The Musical’ मधून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. अॅलेस्टर स्टाउटसाठी ही त्याची पहिली मोठी भूमिका आहे.
‘हॅरी पॉटर’ सीरिजमधील पुर्ण कलाकार यादी
- हॅरी पॉटर: डोमिनिक मॅकलॉघलिन
- हरमायनी ग्रेंजर: अॅरबेला स्टँटन
- रॉन वेस्ली: अॅलेस्टर स्टाउट
- अल्बस डंबलडोर: जॉन लिथगो
- प्रो. मॅकगोनॅगल: जेनेट मॅक्टियर
- प्रो. स्नेप: पापा एसेइडू
- हॅग्रिड: निक फ्रॉस्ट
- क्विरेल: ल्यूक थॅलॉन
- आर्गस फिल्च: पॉल व्हाइटहाउस
कधी आणि कुठे पाहायला मिळेल ही सीरिज?
या वेब सीरिजचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार असून, पहिला भाग 2026 च्या सुरुवातीला HBO Max वर (HBO Max series) प्रसारित होण्याची शक्यता आहे. ही वेब सीरिज जवळपास 10 वर्ष सुरू राहण्याची शक्यता आहे.