Home / मनोरंजन / The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन ४’ मध्ये येणारं मोठा ट्विस्ट! चौथा भाग असणार अधिक मनोरंजक

The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन ४’ मध्ये येणारं मोठा ट्विस्ट! चौथा भाग असणार अधिक मनोरंजक

The Family Man Season : राज–डीके यांच्या सुपरहिट वेब सीरिज द फॅमिली मॅन (The Family Man) चा तिसरा सीजन सध्या...

By: Team Navakal
The Family Man Season
Social + WhatsApp CTA

The Family Man Season : राज–डीके यांच्या सुपरहिट वेब सीरिज द फॅमिली मॅन (The Family Man) चा तिसरा सीजन सध्या प्राइम व्हिडीओ (Prime Video) वर स्ट्रीम होत असून प्रेक्षकांकडून त्याला जोर्दारण प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee) दमदार अभिनयामुळे ही सीरिज पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसत आहे. आता मेकर्सनी चौथ्या सीजन (Season 4) बद्दल देखील मोठी घोषणा केली आहे.

राज–डीके यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत चौथ्या भागाबद्दल बोलताना सांगितले की ‘द फॅमिली मॅन ४’ ची कथा मोठी असणार आहे. त्यामुळे तिला मधेच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘द फॅमिली मॅन’चे मेकर्स राज हे एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. मुलाखतीदरम्यान होस्टने नवीन सीजनचा क्लीफहँगर एंडिंग आणि ‘द फॅमिली मॅन ४’ बद्दल अपडेट त्यांना विचारली. त्यावर मेकर्स म्हणाले की, चौथ्या सीजनची कथा इतकी मोठी आहे की ती एका भागात पूर्ण होणारी नाही. त्यामुळे त्यांनी कथा मध्येच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मेकर्सनुसार, ‘द फॅमिली मॅन ४’ मध्ये कथा जास्तीत जास्त कॅरक्टर्सच्या पर्सनल जर्नीवर उभारली असेल. प्रत्येक पात्राच्या आयुष्यातील वेगळ्या प्रवासाला अधोरेखित करणे हा या सीजनचा प्रमुख हेतू असेल.

मनोज वाजपेयी स्टारर ‘द फॅमिली मॅन’ची सुरुवात २०१९ मध्ये झाली. या वर्षी प्रदर्शित झालेल्या तिसऱ्या सीजनमध्ये श्रीकांत तिवारीच्या आयुष्यातल्या नवीन संघर्षांची कथा दाखवण्यात आली आहे. या भागात निम्रत कौर आणि जयदीप अहलावत यांची एन्ट्री देखील झाली. आणि यात दोघांनीही विलनची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवला.


हे देखील वाचा – Kangana Ranaut And Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या लेकीचा लग्नसोहळा; खासदार सुप्रिया सुळे-कंगना राणावतचे एकत्र नृत्य..कंगना राणावतची सोशल मीडिया स्टोरी चर्चेत..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या