Home / मनोरंजन / ऑस्कर 2026 साठी भारताची अधिकृत एंट्री जाहीर; नीरज घायवानच्या ‘Homebound’ चित्रपटाची निवड

ऑस्कर 2026 साठी भारताची अधिकृत एंट्री जाहीर; नीरज घायवानच्या ‘Homebound’ चित्रपटाची निवड

Homebound Oscars 2026: ऑस्कर 2026 साठी भारताची अधिकृत एंट्री जाहीर झाली आहे. दिग्दर्शक नीरज घायवान आणि निर्माता करण जोहर यांच्या...

By: Team Navakal
Homebound Oscars 2026

Homebound Oscars 2026: ऑस्कर 2026 साठी भारताची अधिकृत एंट्री जाहीर झाली आहे. दिग्दर्शक नीरज घायवान आणि निर्माता करण जोहर यांच्या ‘Homebound’ या चित्रपटाची ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर’ श्रेणीमध्ये निवड करण्यात आली आहे.

इशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निवड 24 चित्रपटांमधून करण्यात आली आहे.

24 चित्रपटांमधून झाली निवड

कोलकाता येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष एन चंद्रा यांनी सांगितले की, विविध भाषांमधील 24 चित्रपटांमधून ‘होमबाउंड’ ची निवड करणे खूप कठीण होते. मात्र, अनेक गोष्टींचा विचार करून भारताच्या वतीने या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. या 12 सदस्यीय निवड समितीत निर्माते, दिग्दर्शक, लेखक, संपादक आणि पत्रकार यांचा समावेश होता.

काय आहे ‘Homebound’ ची कथा?

‘होमबाउंड’ची कथा दोन बालमित्रांवर आधारित आहे. चंदन कुमार (विशाल जेठवा) आणि मोहम्मद शोएब अली (इशान खट्टर) या दोन मित्रांचे स्वप्न आहे की त्यांना पोलीस अधिकारी बनायचं आहे, जेणेकरून त्यांना समाजात सन्मान मिळेल.

समाजात असणाऱ्या भेदभावाच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी धडपडणाऱ्या जान्हवी कपूरच्या भूमिकेशी त्यांची ओळख होते. या चित्रपटात समकालीन भारतातील अनेक सामाजिक-राजकीय समस्यांनाही स्पर्श करण्यात आला आहे.

‘होमबाउंड’ ने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप सोडली आहे. 50 व्या टोरोंटो फिल्म फेस्टिव्हल (TIFF 2025) मध्ये ‘इंटरनॅशनल पीपल्स चॉइस’ श्रेणीमध्ये हा चित्रपट उपविजेता ठरला होता. तसेच, कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्ये या चित्रपटाला 9 मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले होते. प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी यांनी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

कधी होणार चित्रपट प्रदर्शित?

हा चित्रपट आतापर्यंत फक्त फिल्म फेस्टिव्हलमध्येच दाखवण्यात आला होता, पण आता हा चित्रपट 26 सप्टेंबर रोजी भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हे देखील वाचा – लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; 2 महिन्यात करा ‘हे’ काम; अन्यथा पैसे बंद

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या