Home / मनोरंजन / हृतिक रोशनने गर्लफ्रेंडला भाड्याने दिला मुंबईतील आलिशान फ्लॅट; किती आहे भाडे? जाणून घ्या

हृतिक रोशनने गर्लफ्रेंडला भाड्याने दिला मुंबईतील आलिशान फ्लॅट; किती आहे भाडे? जाणून घ्या

Hrithik Roshan Rents Flat to Girlfriend

Hrithik Roshan Rents Flat to Girlfriend: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेस आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा त्याने घेतलेल्या एका वेगळ्या निर्णयामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हृतिकने मुंबईतील जुहू येथील आपला आलिशान फ्लॅट भाड्याने दिला आहे. विशेष म्हणजे, या फ्लॅटमध्ये राहणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून, त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद आहे. या फ्लॅटसाठी हृतिक सबाकडून दर महिन्याला 75,000 रुपये भाडे घेणार आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझाद हे गेल्या सुमारे 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हा फ्लॅट जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील ‘मन्नत अपार्टमेंट्स’मध्ये असून, त्याचे मासिक भाडे 75,000 रुपये आहे.

फ्लॅटचे खास वैशिष्ट्ये

रिपोर्टनुसार, हा फ्लॅट सी-फेसिंग आहे. भाडेकरार 4 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आला असून, यासाठी 1.25 लाख रुपये डिपॉझिट म्हणून जमा करण्यात आले आहेत.

या इमारतीत हृतिकचे एकूण तीन मजले आहेत. त्याने 18 वा मजला आणि 19 व 20 वा मजला एकत्र असलेला डुप्लेक्स 2020 मध्ये 97.5 कोटी रुपयांना खरेदी केला होता. या फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 12,000 स्क्वेअर फूट आहे.

रिअल इस्टेटमध्ये हृतिकची गुंतवणूक

हृतिक रोशनचे रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2025 मध्ये त्याने गोरेगावमधील 2,727 स्क्वेअर फुटाचे कमर्शियल स्पेस 5.62 लाख रुपये प्रति महिना भाड्याने घेतले होते. त्यानंतर मे महिन्यात त्याने वडील राकेश रोशन ( यांच्यासोबत मिळून अंधेरीमधील तीन रेसिडेंशिअल अपार्टमेंट्स 6.75 कोटी रुपयांना विकले.दरम्यान, या भाडेकराराबद्दल हृतिक किंवा सबाच्या प्रतिनिधींकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

‘… म्हणून अमित शाह पुढील 50 वर्ष सत्तेत राहण्याचा दावा करतात’; ‘मतचोरी’च्या आरोपांवरून राहुल गांधींची जोरदार टीका

‘भारताने ‘विश्वगुरू’ बनून जगाला मार्गदर्शन करावे’; मोहन भागवत यांचे महत्त्वाचे विधान, हिंदू संस्कृतीवर म्हणाले…

१ सप्टेंबरपासून सांगली महापालिकेचे कामकाज ऑनलाइन

Share:

More Posts