Jacqueline Fernandez : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) तिच्याविरुद्ध दाखल झालेला एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी आणि सुरू असलेल्या फौजदारी कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण जॅकलिनचा प्रियकर सुकेश चंद्रशेखर(Sukesh Chandrasekhar) च्या २०० कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी (money laundering case) संबंधित आहे, त्यामध्ये जॅकलिनचे नाव बराच काळ चर्चेत आहे.
अभिनेत्रीने यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तिची याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर निराश झालेल्या जॅकलिनने आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जॅकलिनच्या वकिलांचा युक्तिवाद आहे की, सुकेशकडून मिळालेल्या भेटवस्तू गुन्ह्यातून आलेल्या पैशातून खरेदी झाल्या होत्या हे तिला माहीत नव्हते. अभिनेत्रीचा दावा आहे की तिचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, तरीही तिला फसवून यात अडकवले जात आहे. तिच्या म्हणण्यानुसार, या आरोपांमुळे तिच्या प्रतिमेला आणि कारकिर्दीचे नुकसान होत आहे, त्यामुळे तिला या प्रकरणातून मुक्त व्हायचे आहे.
सुकेश चंद्रशेखरवर उद्योगपती, राजकारणी आणि सेलिब्रिटींना फसवल्याचा गंभीर आरोप आहे. चौकशीत ईडीला असे आढळले की, त्याने जॅकलिनला महागड्या कार, दागिने आणि डिझायनर ब्रँडच्या वस्तू भेट दिल्या होत्या. याच भेटवस्तूंमुळे तिचे नाव या प्रकरणाशी जोडले आहे.
हे देखील वाचा –
धनखड यांचा शासकीय घरात जीव गुदमरत होता; अभयसिंह चौटाला यांचा दावा
एच-१ बी व्हिसा फी वार्षिक नाही ! ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टीकरण
नरेंद्र मोदीच २०३९ पर्यंत पंतप्रधानपदाचा चेहरा ! संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचे वक्तव्य