Home / मनोरंजन / Urdu vs Sanskrit: संस्कृत की उर्दू? सर्वात जुनी भाषा कोणती? जावेद अख्तर यांनी दिले उत्तर

Urdu vs Sanskrit: संस्कृत की उर्दू? सर्वात जुनी भाषा कोणती? जावेद अख्तर यांनी दिले उत्तर

Urdu vs Sanskrit: जयपूर साहित्य उत्सवात (JLF 2026) एका सत्रादरम्यान प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांना भाषेच्या प्राचीनतेवरून एक...

By: Team Navakal
Urdu vs Sanskrit Javed Akhtar
Social + WhatsApp CTA

Urdu vs Sanskrit: जयपूर साहित्य उत्सवात (JLF 2026) एका सत्रादरम्यान प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांना भाषेच्या प्राचीनतेवरून एक प्रश्न विचारण्यात आला. “उर्दू आणि संस्कृतमध्ये कोणती भाषा अधिक जुनी आहे?” या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

“उर्दू ही संस्कृतची धाकटी बहीण”

विचारलेल्या प्रश्नावर सुरुवातीला आश्चर्य व्यक्त करत जावेद अख्तर म्हणाले, “हा कसला प्रश्न विचारलात? उर्दू ही संस्कृतची धाकटी बहीण आहे. संस्कृत ही जगातील दुसरी सर्वात जुनी जिवंत भाषा आहे. याउलट, उर्दू भाषेचा इतिहास तर 1000 वर्षांचाही जुना नाही.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जगातील सर्वात जुन्या जिवंत भाषांचा विचार केला तर तमिळ ही पहिल्या क्रमांकावर येते आणि संस्कृत ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे उर्दूची तुलना संस्कृतशी करणे हे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

“जर तुम्हाला तुलना करायची असती, तर लॅटिन आणि ग्रीक यांपैकी जुनी भाषा कोणती, असा प्रश्न विचारणे अधिक तर्कसंगत ठरले असते,” असा टोलाही त्यांनी लगावला.

भाषेची ओढ आणि बालपण

या चर्चेदरम्यान त्यांनी आपल्या साहित्यातील रुचीबद्दलही माहिती दिली. त्यांच्या वयाच्या 8 व्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले, परंतु त्यापूर्वीच्या 5 वर्षांत आईने त्यांच्यावर केलेले संस्कार महत्त्वाचे ठरले.

आईला कादंबऱ्या वाचण्याची प्रचंड आवड होती. खेळता-खेळता तिने शब्दांचे अर्थ आणि उच्चार शिकवले. आजही पटकथा लिहिताना 6-7 वर्षांचा असताना आईकडून ऐकलेल्या शब्दांचा प्रभाव जाणवतो, असे अख्तर यांनी सांगितले.

वारसा आणि तुलना

साहित्यिक कुटुंबाचा वारसा दडपण निर्माण करतो का? यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “दुसऱ्याशी तुलना करणे म्हणजे स्वतःला कमी लेखण्यासारखे आहे. नेहमीच तुमच्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ असेल आणि तुम्ही कोणापेक्षा तरी श्रेष्ठ असाल. तुमची खरी स्पर्धा ही केवळ स्वतःशीच असायला हवी.”

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या