Jolly LLB-3 : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांची मुख्य भूमिका असलेल्या जॉली एलएलबी-३ ( Jolly LLB-3 ) या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळून लावली. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या शुक्रवारी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
असोसिएशन फॉर एडिंग जस्टीस या स्वयंसेवी संस्थेने अॅड. चंद्रकांत गायकवाड यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. चित्रपटात न्यायाधीश आणि वकिलांची थट्टा केल्याचा आरोप करत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची याचिकाकर्त्याने केली होती. तसेच चित्रपटातील भाई वकील है या गाण्यावर आक्षेप घेत या गाण्यामधून न्यायालयीन कामकाज आणि वकिली व्यवसायाचा अवमान करण्यात आल्याने हे गाणे चित्रपटातून वगळावे, अशी मागणीही केली होती.
हंगामी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्या. गौतम अखंड यांच्या पीठासमोर आज या याचिकेवर सुनावणी झाली. त्याप्रसंगी ‘आम्हाला सुरुवातीपासूनच टीका आणि थट्टा सहन करावी लागते. त्यात काही नवे नाही. याचिकाकर्त्याने आमची काळजी करू नये’, असे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळ
हे देखील वाचा –
दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला पडतोय ‘काळा’; कारण काय? वाचा