Juhi Chawla Net Worth: बॉलिवूडमध्ये सध्या दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि दक्षिणेत नयनतारा यांसारख्या अभिनेत्रींचा दबदबा असला तरी, भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीचा मान यापैकी कोणालाच मिळालेला नाही.
अभिनय क्षेत्रात सध्या पूर्णवेळ सक्रिय नसलेल्या, 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री जुही चावलाने (Juhi Chawla) या सर्वांना संपत्तीच्या बाबतीत खूप मागे टाकले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 (Hurun India Rich List 2025) नुसार, जुही चावला ही भारतातील सर्वात श्रीमंत महिला कलाकार ठरली आहे.
जुही चावलाची संपत्ती 7790 कोटी रुपये
हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये जुही चावलाची एकूण संपत्ती तब्बल 7,790 कोटी रुपये (सुमारे 880 मिलियन डॉलर्स) इतकी आहे. या संपत्तीमुळे ती केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक बनल्या आहेत.
जुही चावला यांची बहुतांश संपत्ती त्यांच्या अभिनयातून नाही, तर त्यांचे पती जय मेहता यांच्यासोबतच्या विविध व्यवसायातून आली आहे. या व्यवसायांमध्ये रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊस आणि नाईट रायडर्स क्रिकेट टीम्सचा समावेश आहे.
या यादीनुसार, जुही चावला संपत्तीच्या बाबतीत शाहरुख खान (12,490 कोटी रुपये) नंतरच्या दुसऱ्या स्थानावर आहे आणि तिने हृतिक रोशन (2,160 कोटी रुपये) आणि अमिताभ बच्चन (1,630 कोटी रुपये) यांनाही मागे टाकले आहे.
हुरून रिच लिस्टबद्दल
हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटने ही वार्षिक श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. चित्रपट क्षेत्राव्यतिरिक्त, या संपूर्ण यादीत मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान कायम ठेवत, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे आपले स्थान मजबूत केले आहे.
हे देखील वाचा – पंतप्रधान मोदींनी जारी केले 100 रुपयांचे विशेष नाणे; पहिल्यांदाच नाण्यांवर ‘हा’ फोटो