Home / मनोरंजन / Kangana Ranaut : कंगनाची थेट किंग खान शाहरुख सोबत तुलना..

Kangana Ranaut : कंगनाची थेट किंग खान शाहरुख सोबत तुलना..

Kangana Ranaut : कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली कंगना (Kangana Ranaut)आता पुन्हा एकदा चर्चेत असल्याचं दिसून येत आहे. यावेळी तिने थेट...

By: Team Navakal
Kangana Ranaut

Kangana Ranaut : कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली कंगना (Kangana Ranaut)आता पुन्हा एकदा चर्चेत असल्याचं दिसून येत आहे. यावेळी तिने थेट शाहरुख खानशी (Shahrukh Khan) स्वतःची तुलना केली आहे. कंगना अनेकदा स्वतःला ‘लेडी खान’ म्हणते आणि तिने आधीपासूनच शाहरुख, सलमान, आमिर खान या तीनही खानसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यावेळी तिने अजबच तुलना केली आहे. ज्यामुळे तिचे चाहते देखील थक्क आहेत. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना तिने स्वतःच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे.

शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केल्याचा दावा-
दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना तिने स्वतःच्या संघर्षाबद्दल अधिक सांगितलं त्यात तिने शारुख खान सोबत स्वतःची तुलना केली आहे. ती म्हणते ‘शारुखपेक्षा जास्त मेहनत करून मी आपलं स्थान मिळवलं आहे’, “मी एका छोट्या गावातून मुंबईत आले आणि आज या पातळीवर पोहोचले. शाहरुख खान दिल्लीचा आहे, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तो शिकलेला, पण; मी हिमाचलमधल्या भांबला नावाच्या गावातून आले आहे ज्याचं नावही फार कमी लोकांनी ऐकलं असेल”

ती पुढं म्हणते, “लोकांना कदाचित माझं म्हणणं कधीच मान्य नसेल, पण मला वाटतं मी कायमच स्वतःशी आणि लोकांशी नेहमी प्रामाणिक राहिलेय. या इंडस्ट्रीत टिकून राहून स्थान बळकट करण्यासाठी मी अफाट मेहनत घेतली आहे. गाव खेड्यातून येऊन मुख्य प्रवाहात इतकं यश मिळवणं हे फार थोड्यांना शक्य झालं आहे.”

स्वबळावर मिळवलं यश
कंगना पुढे सांगते ती लहान वयात घर सोडून मुंबईत आली होती. फक्त १९ वर्षांची असताना तिनं ‘गँगस्टर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पहिल्यांदा पदार्पण केलं. त्यानंतर ‘फॅशन’, ‘तनु वेड्स मनु’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ आणि ‘क्वीन’ यांसारखे हिट चित्रपट तिने दिले. तिचं म्हणणं आहे की यश तिला कुणाच्या ओळखीवर नाही, तर स्वतःच्या मेहनतीवर स्वतः स्वबळावर तिने ते कमवले आहे.


हे देखील वाचा – Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो ३ च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या