Home / मनोरंजन / Kartik Aaryan : चित्रपट फ्लॉप झाल्याने कार्तिक आर्यनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Kartik Aaryan : चित्रपट फ्लॉप झाल्याने कार्तिक आर्यनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Kartik Aaryan : बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या एका मोठ्या निर्णयामुळे चर्चेत आला आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेला...

By: Team Navakal
Kartik Aaryan
Social + WhatsApp CTA

Kartik Aaryan : बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या एका मोठ्या निर्णयामुळे चर्चेत आला आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेला ‘तू मेरी मैं तेरा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटाच्या अपयशानंतर कार्तिकने स्वतःहून पुढाकार घेत आपल्या मानधनात मोठी कपात केली आहे.

त्याने आपल्या फीमधील सुमारे 15 कोटी रुपये सोडण्याचा निर्णय घेतला असून, चित्रपट निर्मात्यांना झालेला आर्थिक फटका कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

या चित्रपटानंतर कार्तिक आर्यन आणि निर्माता करण जोहर यांच्यातील संबंध बिघडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, मानधनात कपात करून कार्तिकने या अफवांना पूर्णविराम दिला आहे. व्यावसायिक संबंधांमध्ये कोणताही तणाव नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

आधीही केली होती फी कमी

कार्तिकने अशा प्रकारे मानधनात कपात करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ‘शहजादा’ चित्रपट फ्लॉप झाल्यावरही त्याने मानधन कमी करून निर्मात्यांना सहकार्य केले होते. कार्तिक धर्मा प्रोडक्शनच्या टॅलेंट एजन्सीपासून वेगळा झाल्याच्या बातम्या देखील चुकीच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या तो याच प्रोडक्शनच्या ‘नागझिला’ या नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

खाजगी आयुष्याचीही चर्चा

केवळ चित्रपटांमुळेच नाही, तर कार्तिक त्याच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करतानाचे त्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. युकेमधील करीना कुबिलियुटे नावाच्या तरुणीसोबत त्याचे नाव जोडले जात आहे.

दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये कमालीचे साम्य असल्याने त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, करीनाने या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. विशेष म्हणजे, या अफवा सुरू होताच कार्तिकने तिला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचेही समोर आले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या