KBC Amitabh Bachchan Child Row: गुजरातच्या गांधीनगर येथील इशित भट्ट नावाचा पाचवीत शिकणारा विद्यार्थी ‘कौन बनेगा करोडपती’ च्या 17 व्या पर्वात सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. अमिताभ बच्चन यांनी उद्धटपणे उत्तर देणे, तसेच अतिआत्मविश्वासामुळे एकही रुपया जिंकता न आल्याने या 10 वर्षीय मुलाची सोशल मीडियावर चर्चे रंगली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करत असताना भट्टच्या आत्मविश्वासाचे रूपांतर वादात झाले. अनेक दर्शकांनी त्याचा बोलण्याचा सूर आणि पद्धत अनादरयुक्त आणि उद्धट मानली, ज्यामुळे पालकत्व आणि विनयशीलतेच्या भूमिकेवर तीव्र टीका आणि वादविवाद सुरू झाले आहेत.
Very satisfying ending!
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) October 12, 2025
Not saying this about the kid, but the parents. If you can't teach your kids humility, patience, and manners, they turn out to be such rude overconfident lot. Not winning a single rupee will surely pinch them for a long time.
pic.twitter.com/LB8VRbqxIC
KBC मध्ये घडला प्रकार
10 वर्षांचा इशित भट्ट केबीसीमध्ये हॉट सीटपर्यंत पोहोचला होता. मात्र, आपल्या सेगमेंटच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांना थेट सांगितले की, “मला नियम माहित आहेत, त्यामुळे तुम्ही मला आता नियम समजावून सांगू नका.”
त्याचा हा उद्धटपणा संपूर्ण एपिसोडमध्ये कायम राहिला. प्रत्येक प्रश्नाच्या वेळी त्याने त्वरित उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, 25 हजारांच्या प्रश्नावेळी अतिआत्मविश्वास त्याला चांगलाच महागात पडला.
रामायणावर आधारित एका प्रश्नावर त्याने स्वतःहून पर्यायांची मागणी केली. दुर्दैवाने, त्याने चुकीचे उत्तर दिले आणि कोणतीही रक्कम न जिंकता कार्यक्रमातून बाहेर पडला. या संपूर्ण परिस्थितीवर अमिताभ बच्चन यांनी, “कधीकधी मुले ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चूक करतात” अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर हा एपिसोड त्वरीत व्हायरल झाला.
सोशल मीडियावर पालकत्वावर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. एका यूजरने पोस्ट केले की, मुलाकडे ज्ञान असणे ठीक आहे, पण जर त्याला वडीलधाऱ्यांसमोर कसे बोलावे हे माहित नसेल, तर तो यशस्वी होऊ शकत नाही.
तर दुसऱ्याने म्हटले, “अहंकाराला धडा मिळाला. आता पालकांनी शिकले पाहिजे.” अनेकांनी भट्टच्या वागणुकीला पालकांच्या दुर्लक्षामुळे जोडले, त्यांनी सांगितले की, वडीलधाऱ्यांचा आदर आणि नम्रता हे मुलांमध्ये रुजवले पाहिजे.
हे देखील वाचा – ‘जे हुंडा घेतात ते नामर्द…’; अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे परखड विधान, म्हणाले…