Kiara Advani Sidharth Malhotra Baby | बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) आता आई-बाबा झाले आहेत. कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
कियारा आणि सिद्धार्थने अद्याप या बाबतची अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. तरीही, चाहते आनंदाने फुलून गेले असून, सोशल मीडियावर शुभेच्छांचा ओघ सुरू आहे. हिंदुस्तान टाइम्सनुसार, तिने मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात सामान्य प्रसूतीद्वारे मुलीला जन्म दिला. फेब्रुवारीत त्यांनी प्रेग्नेंसीची माहिती देत बेबी शॉवरचा फोटो शेअर केला होता. कियाराच्या प्रेग्नेंसीचेकाही फोटो देखील समोर आले होते.
कियाराने मेट गाला आणि सोशल मीडियावर प्रेग्नेंसीचा प्रवास आनंदाने साजरा केला.फोटोत “आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट लवकरच” असे कॅप्शन लिहून त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.
दरम्यान, ‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर या जोडप्याच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले होते. त्यानंतर 7 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी राजस्थान येथे लग्न केले. आता लग्नाच्या दोन वर्षानंतर ते पालक झाले आहेत.
दोघांच्या कामाबद्दल सांगायचे तर कियारा ‘वॉर 2’ मध्ये हृतिक रोशनसोबत 14 ऑगस्ट 2025 रोजी झळकणार आहे, तर सिद्धार्थ ‘परम सुंदरी’मध्ये जान्हवी कपूरसोबत रोमँटिक कॉमेडी सादर करणार आहे.
हे देखील वाचा –