Home / मनोरंजन / 300 कोटींची कमाई करणारा चित्रपट लवकरच OTT वर; या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

300 कोटींची कमाई करणारा चित्रपट लवकरच OTT वर; या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Lokah OTT Release: मल्याळम चित्रपटसृष्टीतील अलीकडील ब्लॉकबस्टर ‘लोकाह’ ने बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शनची...

By: Team Navakal
Lokah OTT Release

Lokah OTT Release: मल्याळम चित्रपटसृष्टीतील अलीकडील ब्लॉकबस्टर ‘लोकाह’ ने बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची चाहते वाट बघत आहे. आता चित्रपटाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मची माहिती समोर आली आहे.

Lokah Chapter 1: Chandra लवकरच स्ट्रीमिंग ॲप जिओहॉटस्टारवर रिलीज होणार आहे. अद्याप रिलीजची तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी सोशल मीडियावर याचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

प्रदर्शनासाठी चाहते उत्सुक

हा चित्रपट ऑनलाईन पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. चाहत्यांनी हिंदी भाषेत चित्रपट प्रदर्शित करण्याची विनंतीही केली आहे.

‘लोकाह भाग 1: चंद्र’ हा चित्रपट दुलकीर सलमानच्या वेफेअरर फिल्म्स बॅनरखाली तयार झाला असून, तो डॉमिनिक अरुण यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.

या चित्रपटात अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शनने एका सुपरहिरोची भूमिका साकारली आहे. नस्लेन, चंदू सलीमकुमार, अरुण कुरियन आणि सँडी यांनीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 28 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि समीक्षक तसेच प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले आहे.

‘लोकाह भाग 2’ ची घोषणा

नुकतेच, दुलकीर सलमानने या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ‘लोकाह भाग 2’ ची घोषणा केली आहे. सप्टेंबरमध्ये, एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दुसऱ्या भागाची पहिली झलक दिली. हा सिक्वेल चित्रपटातील टोविनो थॉमस यांच्या चातन या व्यक्तिरेखेवर आधारित असण्याची अपेक्षा आहे.

या टीझरमध्ये टोविनो आणि दुलकीर सलमान यांच्यात विनोदी संवाद आहेत. दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन डॉमिक अर्जुन करणार असून, त्यात टोविनो थॉमस मुख्य भूमिकेत असेल.

हे देखील वाचा – ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित-विराट निवृत्त होणार का? BCCI उपाध्यक्ष म्हणाले…

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या