Home / मनोरंजन / Aligarh Temple : अलीगढच्या मंदिरावर हिंदूंनीच ‘आय लव्ह मोहंमद ‘ लिहिले

Aligarh Temple : अलीगढच्या मंदिरावर हिंदूंनीच ‘आय लव्ह मोहंमद ‘ लिहिले

Aligarh Temple – उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलीगढमध्ये मंदिराच्या भिंतीवर ‘आय लव्ह मोहंमद ‘ (I Love Mohammad)असे लिहून धार्मिक तणाव...

By: Team Navakal
Aligarh Temple


Aligarh Temple – उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलीगढमध्ये मंदिराच्या भिंतीवर ‘आय लव्ह मोहंमद ‘ (I Love Mohammad)असे लिहून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली. हे चारही आरोपी हिंदू आहेत. मुस्लिम शेजाऱ्याशी झालेल्या वादातून (Dispute with a Muslim)त्यांनी हा कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.


२५ ऑक्टोबर रोजी लोढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगवानपूर (Bhagwanpur) आणि बुलकगढी गावातील चार मंदिरांच्या भिंतींवर अज्ञातांनी आय लव्ह मोहम्मद असे वाक्य लिहिल्याचे आढळून आल्यानंतर गावांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मुस्लिमांनीच हे कृत्य केले, असा गावकऱ्यांचा समज झाला होता. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता खरा प्रकार उघड झाला.

आरोपींपैकी एकाचा गुल मोहंमद (Gul Mohammad) नामक मुस्लिम शेजाऱ्याशी वाद झाला होता.त्याचा सूड घेण्यासाठी आरोपींनी हे कारस्थान रचले.मंदिरांवर ‘आय लव्ह मोहंमद ‘ लिहिल्याने पोलीस परिसरातील मुस्लिमांची कसून चौकशी करतील, अशी अटकळ त्यांनी बांधली होती. मात्र पोलिसांनी चतुराईने केलेल्या तपासामुळे त्यांचा दुष्ट हेतू फसला. जिशांत सिंह, आकाश सारस्वत, दिलीप शर्मा आणि अभिषेक सारस्वत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


हे देखील वाचा –

तटकरेंचा शेवटचा हिशोब चुकता करणार! आमदार दळवींचा इशारा

राज ठाकरेंचा मोठा इशारा! शिवरायांच्या किल्ल्यांवर ‘नमो पर्यटन केंद्र’ उभारल्यास फोडून टाकणार

पवईत थरारनाट्य! कंत्राटदाराने 17 मुलांना ओलीस धरले!मोदींनी कौतुक केले! सरकारने 2 कोटी थकवले! रोहितचा एन्काऊंटर

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या