Madhumati : कलाविश्वावर अजून एका दुःखाचा घाला. अभिनेते पंकज धीर यांच्या निधनानं सर्वजण शोक व्यक्त करत असतानाच, आणखी एका दिग्गज अभिनेत्रीच्या निधनाची दुःखद बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन झालं असून त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मधुमती केवळ एक उत्तम अभिनेत्री नव्हत्या तर एक उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून सुद्धा प्रसिद्ध होत्या
दिग्गज अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना मधुमती यांच्या निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली देणारी पोस्ट शेअर केली आहे.
मधुमती यांच्या सिनेमाबद्दल सांगायचं तर त्यांनी आंखे, टॉवर हाऊस, शिकारी आणि मुझे जीने दो यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मधुमती यांना लहानपणापासूनच नृत्याची आवडसल्याने त्यांनी भरतनाट्यम, कथक, मणिपुरी आणि कथकली सारख्या शास्त्रीय नृत्यांचे शिक्षण घेतलं. अनेक गाण्यांमध्ये मधुमती यांचा अभिनय सुपरहिट देखील झाला.
ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती त्यांच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे देखील बऱ्याच चर्चेत राहिल्या आहेत. मधुमती यांनी वयाच्या १९ व्या वर्षी स्वतः पेक्षा वयाने मोठ्या आणि चार मुलांचे वडील असलेल्या नर्तक दीपक मनोहर यांच्यासोबत लग्न केलं होत. दीपक मनोहर यांच्या पहिल्या पत्नीचं दुर्दैवी निधन झालं. त्यांनतर त्यांनी मधुमती यांच्याशी लग्न केलं.
हे देखील वाचा – Adani Eyes Sahara Deal : अदानी खरेदी करणार सहाराच्या ८८ मालमत्ता! १ लाख कोटींचा व्यवहार?