Mahesh Kothare Statement: मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर, मागाठाणे येथे आयोजित दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. भाजप म्हणजे आपले घर आहे. मी स्वतः भाजपाचा भक्त आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
Mahesh Kothare Statement: “भाजप म्हणजे आपलं घर; मी मोदीजींचा भक्त आहे”
बोरिवलीत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महेश कोठारे यांनी भाजपबद्दलचे आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त केले. ते म्हणाले, “हा कार्यक्रम आपल्या घरचा आहे. भाजप म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे.”
कोठारे यांनी यापूर्वीही निवडणुकीदरम्यान भाजपला समर्थन दिले होते आणि त्यांच्या या विधानामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हे ज्येष्ठ मराठी अभिनेते महेश कोठारे! मराठी भाषेने, मुंबईने आणि महाराष्ट्राने यांना देशभर ओळख दिली. संपूर्ण करिअर याचं मुंबई आणि मराठी भाषेच्या आधारवर उभं राहील. आता यांचं घर भाजप . हे मोदींचे भक्त झाले आणि मुंबईची महानगर पालिका यांना भाजपकडे द्यायचीये. व्वा कोठारे. खानदानी हलकट! pic.twitter.com/jgyxEjpuxf
— Ganesh Pokale (@P_Ganesh_07) October 20, 2025
मुंबईचा महापौर आपल्याच विभागातून होणार
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीवर जोर देत कोठारे यांनी भाजपच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांनी दावा केला, “पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या कार्यक्रमापर्यंत मुंबईवर कमळ फुललेलं असेल याची मला गॅरंटी आहे.”
“आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचा आहे, पण यावेळचा महापौरही इथून निवडून गेलेला असेल. या विभागातून येणारा नगरसेवक हा केवळ नगरसेवक नसेल, तर भाजपने ठरवलं, नव्या चेहऱ्यांना संधी द्यायचं, तर मुंबईचा महापौर इथूनच निवडला जाईल,” असे कोठारे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपने मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर दावा करण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येते.
यावेळी व्यासपीठावर भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजप उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बाळा तावडे आणि महेश कोठारे उपस्थित होते.
हे देखील वाचा – अमेझॉनची AWS सेवा काय आहे? यातील अडथळ्यामुळे हजारो वेबसाइट्स-ॲप्स बंद पडण्याचे नेमके कारण काय?