Home / मनोरंजन / Marathi Thriller Movie : पुष्कर जोगचा नवा थ्रिलर चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!

Marathi Thriller Movie : पुष्कर जोगचा नवा थ्रिलर चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!

Marathi Thriller Movie : चित्रपट आणि त्याबद्दल वाटणार अप्रूप हे अजबच असत मग तो चित्रपट कोणत्याही माध्यमांमधला असला तरीही. लवकरच...

By: Team Navakal
Marathi Thriller Movie

Marathi Thriller Movie : चित्रपट आणि त्याबद्दल वाटणार अप्रूप हे अजबच असत मग तो चित्रपट कोणत्याही माध्यमांमधला असला तरीही. लवकरच प्रेक्षकांसमोर येत असलेला ‘ह्युमन कोकेन’ हा तसाच एक धाडसी, सायकोलॉजिकल थ्रिलर असा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना मानवी तस्करी, सायबर सिंडिकेट आणि ड्रग कार्टेलच्या काळोख्या, भयानक आणि अनाकलनीय अश्या जगात घेऊन जाणार आहे.

या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग पुन्हा एकदा एका तीव्र, आव्हानात्मक आणि भावनिक भूमिका साकारताना दिसणार आहे.’जबरदस्त’ या मराठी चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाला त्याने सुरवात केली. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सिझनमधील लोकप्रिय रनर-अप ठरलेला पुष्कर जोग हा , ‘व्हिक्टोरिया – एक रहस्य’च्या यशानंतर आता एका पूर्णपणे वेगळ्या आणि गडद अश्या भूमिकेत झळकणार आहे.

या चित्रपटात इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही ब्रिटिश कलाकारांची देखील दमदार स्टारकास्टिंग आहे. त्यामुळे या चित्रपटाला एक आंतरराष्ट्रीय लुक मिळाला आहे. दिग्दर्शक सरीम मोमिन यांनी या चित्रपटाचं उत्तम लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. ह्युमन कोकेन’ हा सिनेमा १६ जानेवारी २०२६ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हे देखील वाचा – Health Tips : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय?

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या