Mayuri Wagh: ‘अस्मिता’ (Asmita)मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री मयुरी वाघ (Mayuri Wagh) सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेमुळे तिच्या आयुष्यात अनेक नव नवीन वळण देखील आली. याच मालिकेदरम्यान मयुरी आणि पियुष रानडे(Piyush-ranade) हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला
पण, लग्नानंतर दोनच वर्षांतच मयुरी आणि पियुष विभक्त झाले. त्यांचा घटस्फोट हा त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. आता इतक्या वर्षांनी मयुरीने पहिल्यांदाच तिच्या घटस्फोटाबद्दल एका मुलाखतीत भाष्य केल आहे. या मुलाखती दरम्यान मयुरीने अनेक खुलासे केले आहेत. मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा खुलासा देखील तिने या मुलाखतीती केला आहे.
मयुरीचे मुलाखतीमधले खुलासे..
या मुलाखतीती ती सांगते “मला कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप आजही नाही. पण, मी लग्नाचा निर्णय खूपच लवकर घेतला. आताची जनरेशन प्रचंड विचार करून लग्न करते. जे मी तेव्हा नाही केलं. मी खूप पटकन घाई गडबडीत निर्णय घेतला. तेव्हाही माझ्या पालकांनी मला पाठिंबा दिला. सहा महिन्यांतच कळलं की निर्णय चुकला आहे. पण, ते मला ते स्वीकारणं कठीण जात होत.
त्या काळात सहकलाकारांचा पाठिंबा..
त्यानंतर जेव्हा मी “ती फुलराणी” शूट करत होते, तेव्हा तिथले सहकलाकार होते त्यांना माहीत होतं की माझ्या खाजगी आयुष्यात काहीतरी घडतंय. जे मी शेअर करू शकत नाहीये. पण ते माझ्यासोबत कायम असायचे. पर्सनल आयुष्यात मी प्रचंड तणावात आहे हे त्यांना कळत होतं. सकाळी ८ वाजता सेटवर आल्यावर शूटिंग संपून पॅकअप जरी झालं,तरी ते माझ्यासोबत असायचे.
“माझ्या आईबाबांना पहिल्या ४ महिन्यांतच समजलं होतं की हे चुकल आहे. पण, मला समजायला जवळ जवळ दीड वर्ष गेलं. ज्या व्यक्तीवर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवलाय ती व्यक्ती हे अस करूच शकत नाही. हे मला समजायला फार वेळ गेला. ते स्वीकारान मला खूप जड गेलं. आणि त्यातून बाहेर येऊन निर्णय घ्यायलाही मला खूप वेळ गेला. पुढे जावं की तिथेच अडकाव किंवा आहे तसं सोडून द्यावं हे माझं मलाच कळत नव्हतं. नशिबाने त्यावेळी मी शूटिंग करत होते. त्यामुळे मी थोडी शांत होती. मला हे पटतच नव्हतं की माझ्यासोबतसुद्धा हे घडू शकतं. ज्याच्यावर मी एवढा विश्वास ठेवला, त्याबद्दल काही गोष्टी माझ्या कानावर येत होत्या त्याकडे मी दुर्लक्ष केल. पण त्या व्यक्तीकडून माझा विश्वासघात झाला असं देखील मयुरी म्हणाली.
शारीरिक छळाचा खुलासा..

पुढे ती म्हणते “आपल्याकडे मुलींना शिकवलं जातं की सहन करावं लागत. लग्नानंतर काही गोष्टी बदलतात देखील. पण, कधीपर्यंत हे सगळं सहन करत राहायचं हे देखील आपण शिकवलं पाहिजे. मी त्याच्या सेटवर त्याला सरप्राइज द्यायला जायचे आणि तो तिथे नसायचा. कुठे जायचा मला माहीत नाही, फोन देखील उचलायचा नाही आणि मग खूप वेग-वेगळ्या गोष्टी मग ऐकायला मिळायची. या पुढे शारीरिक केल्याचा खुलासा देखील तिने केला.
हे देखील वाचा-