Mrs Universe 2025 Winner Sherry Singh: आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा Mrs Universe 2025 मध्ये भारताने इतिहास रचला आहे.फिलिपिन्समधील मनीला येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या 48 व्या आवृत्तीचा बहुमान भारताच्या शैरी सिंग (Sherry Singh) यांनी मिळवला आहे. तब्बल 120 सौंदर्यवतींना मागे टाकून शैरी सिंग यांनी हा मानाचा मुकुट (Crown) आपल्या नावावर केला.
मुकुट जिंकल्यावर झाल्या भावूक
शैरी सिंग यांना क्राऊन परिधान करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात त्या भावूक झालेल्या दिसत आहेत. मुकुट जिंकल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हा केवळ त्यांच्या एकट्याची किताब नसून, “ज्या महिलांनी आपली स्वप्ने बाजूला ठेवून जीवन जगले आहे किंवा जी आपली स्वप्ने पूर्ण करू शकल्या नाहीत, त्यांची ही जीत आहे,” असे म्हटले.
त्यांनी आपले मत स्पष्ट करताना सांगितले की, जगाला हे दाखवून देणे गरजेचे आहे की, केवळ बाह्य सौंदर्यनाही, तर शक्ती, दयाळूपणा आणि समजदारपणा हेच खरे सौंदर्य परिभाषित करतात. त्यांच्या मते, ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणे महत्त्वाचे आहे.
कोण आहेत शैरी सिंग?
पेशाने मॉडेल असलेल्या शैरी सिंग सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर 18 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. 2024 मध्ये त्यांनी मिसेस भारत युनिव्हर्सचे प्रतिनिधित्व केले होते, तर 2025 मध्ये त्यांनी मिसेस इंडिया युनिव्हर्सचे प्रतिनिधित्व केले.
शैरी सिंग या गेल्या 9 वर्षांपासून सिकंदर सिंग यांच्यासोबत विवाहित आहेत आणि त्यांना एक मुलगा आहे. आपल्या मुलासोबतचे खास फोटो त्या अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात.
हे देखील वाचा – ‘या’ देशात बुरखा आणि नकाबवर संपूर्ण बंदी येणार! ‘इस्लामिक फुटीरतावाद’ थांबवण्यासाठी नवा कायदा