Navina Bole on Sajid Khan | अभिनेत्री नवीना बोले (Navina Bole) हिने दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) याच्याशी संबंधित एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. ‘इश्कबाज’, ‘मिले जब हम तुम’ सारख्या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या नवीनाने साजिद खानवर कास्टिंग काउचचा आरोप केला आहे.
साजिद खानने एका प्रोजेक्टसाठी बोलावले असताना तिला कपडे काढण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप नवीनाने केला आहे. तसेच, साजिदला कधीही भेटू इच्छित नाही.
नवीना बोलेने काय आरोप केले?
सुभोजित घोषशी बोलताना एका मुलाखतीदरम्यान नवीना म्हणाली, “मी आयुष्यात कधीच पुन्हा भेटू नये असे वाटणारा भयानक माणूस म्हणजे साजिद खान आहे. त्याने महिलांचा अपमान करण्यामध्ये सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. एका प्रोजेक्टसाठी मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले असताना त्याने मला कपडे काढून केवळ अंतर्वस्त्रांमध्येबसायला सांगितले. कारण त्याला पाहायचे होते की मी अशा स्थितीमध्ये किती ‘कंफर्टेबल’ आहे.” ही घटना 2004-2006 ची असल्याचेही तिने सांगितले
ती पुढे म्हणाली, “तो म्हणाला, ‘तू स्टेजवर बिकिनी घालतेस ना, मग इथे काय अडचण आहे?’ मी गोंधळले आणि उत्तर देऊ शकले नाही. मी त्याला सांगितले की, जर पाहायचंच असेल तर मी घरी जाऊन बिकिनी घेऊन येईन, पण आत्ता इथे कपडे उतरवणार नाही. कसे तरी मी त्या ठिकाणाहून बाहेर पडले. त्यानंतर त्याने मला सुमारे 50 वेळा फोन करून विचारणा केली.”
पूर्वीही साजिद खानवर आरोप
2018 मध्ये #MeToo मोहिमेदरम्यान अभिनेत्री राहेल व्हाईट, सहाय्यक दिग्दर्शिका सलोनी चोप्रा आणि पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनीही साजिद खानवर लैंगिक छळाचे आरोप केले होते.
दम्यान, नवीना बोलेच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती ‘मिले जब हम तुम’, ‘जिनी और जुजू’, ‘सपना बाबुल का…बिदाई’ (आणि ‘इश्कबाज’ यांसारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते.









