OTT Releases November 2025 : नोव्हेंबर 2025 मध्ये OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. या महिन्यात बहुप्रतिक्षित क्राईम थ्रिलर सिरीज, स्पाय ड्रामा, फॅमिली शो आणि सुपरनॅचरल चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, सोनीलिव्ह आणि जी5 सारख्या प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक दमदार कन्टेन्टची मेजवानी आहे. बिंज-वॉचिंगसाठी सज्ज व्हा आणि नोव्हेंबर महिन्यातील या मोठ्या रिलीजची यादी पाहा.
OTT Releases November 2025 : OTT वर प्रदर्शित होणारे प्रमुख चित्रपट आणि सिरीज
1. The Family Man Season 3 (द फॅमिली मॅन सीझन 3) – Amazon Prime Video वर 21 नोव्हेंबर रोजी रिलीज होणारी ही सिरीज यावेळीही मनोज बाजपेयीच्या श्रीकांत तिवारीच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते, जो नवीन आणि धोकादायक शत्रूंशी लढताना दिसणार आहे.
2. Delhi Crime 3 (दिल्ली क्राईम 3) – Netflix वर 13 नोव्हेंबरला ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. डीसीपी वर्तिका चतुर्वेदी बनलेल्या शेफाली शाह या सिरीजमध्ये मानवी तस्करीच्या एका मोठ्या टोळीशी लढा देताना दिसतील. हुमा कुरेशीची खलनायिकेची भूमिका लक्षवेधी आहे.
3. Maharani 4 (महारानी 4) – SonyLIV वर 7 नोव्हेंबर रोजी रिलीज होणारी ही राजकीय ड्रामा सिरीज बिहारच्या मुख्यमंत्री रानी भारतीचा प्रवास 2010 च्या दशकात राष्ट्रीय राजकारणाकडे घेऊन जाते.
4. Stranger Things Season 5 (स्ट्रेंजर थिंग्ज सीझन 5) – Netflix (नेटफ्लिक्स) वर 26 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा 4 एपिसोड्सचा असलेला हा सिरीजचा शेवटचा आणि बहुप्रतिक्षित सीझन आहे, ज्यात अनेक नवीन आणि धक्कादायक ट्विस्ट्स पाहायला मिळतील.
5. Frankenstein (फ्रँकेनस्टीन) – Netflix वर 7 नोव्हेंबर रोजी रिलीज होणाऱ्या या थरारक चित्रपटाची कथा एका तरुण वैज्ञानिकावर आधारित आहे, जो मृत अवयवांचे तुकडे एकत्र करून एक भयानक जीव तयार करतो.
6. Thode Door Thode Paas (थोडे दूर थोडे पास) – Zee5 वर 7 नोव्हेंबर रोजी ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. पंकज कपूर, मोना सिंग आणि कुणाल रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिरीजमध्ये कुटुंबातील सदस्यांना 6 महिने गॅझेट्सपासून दूर राहण्यासाठी 1 कोटींचा प्रस्ताव मिळतो.
7. Baramulla (बारामुला) – Netflix वर 7 नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या या सिरीजमध्ये मानव कौल हे डीएसपीच्या भूमिकेत आहेत, जे बारामुला येथे एका जादूच्या शोदरम्यान गायब झालेल्या मुलाची चौकशी करतात.
8. Maxton Hall Season 2 (मॅक्सटन हॉल सीझन 2) – Amazon Prime Video (वर 7 नोव्हेंबरला ही सिरीज येत आहे. रूबी आणि जेम्सच्या नात्यातील फसवणूक आणि भावनिक उलथापालथीवर ही कथा आधारित आहे.
9. Ziddi Ishq (जिद्दी इश्क) – JioHotstar (जिओहॉटस्टार) वर 21 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा 2019 च्या बंगाली चित्रपट ‘परिनीता’चा हा हिंदी रिमेक आहे, ज्यात आदिती पोहनकर विद्यार्थिनीच्या आणि परमब्रता चटर्जी ट्यूशन टीचरच्या भूमिकेत दिसतील.
10. Sunny Sanskari Ki Tulsi Kumari (सनी संस्कारी की तुलसी कुमारी) – Netflix वर नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणारी ही रोमँटिक कॉमेडी कथा असून, यात दिल्लीतील दोन जुने प्रियकर वरुण धवन आणि जान्हवी कपूर त्यांचे जुने प्रेम पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतात.
हे देखील वाचा – Best Affordable Cars : पहिली कार, कमी बजेट! 4 लाखांपासून सुरू होणारे 5 बेस्ट पर्याय; 34KM पर्यंत मायलेज









