Pawandeep Rajan | ‘इंडियन आयडल’ विजेता पवनदीपच्या गाडीला भीषण अपघात, प्रकृती चिंताजनक

Pawandeep Rajan Accident

Pawandeep Rajan Accident | ‘इंडियन आयडल सीझन 12’ (Indian Idol) चा विजेता आणि लोकप्रिय गायक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) याचा काल (5 मे) भीषण अपघात (Car Accident) झाला. सध्या त्याला आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

पवनदीप उत्तराखंडहून दिल्लीकडे येत असताना गजरौला येथे त्यांच्या हेक्टर कारला (Hector Car) भीषण अपघात झाला. चालक राहुल सिंह याला झोप आल्याने गाडी थेट एका कॅन्टरवर आदळली. या धडकेत पवनदीपच्या दोन्ही हातांना व दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले असून त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यासोबतचे दोन साथीदारही जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.

सुरुवातीला पवनदीपला गजरौला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर अधिक चांगल्या उपचारासाठी त्याला नोएडामधील फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospital) हलवण्यात आले आहे. सध्या त्याला ICU मध्ये ठेवण्यात आले असून डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

गजरौला पोलीस स्टेशनचे हाऊस ऑफिसर अखिलेश प्रधान यांनी सांगितले की, अपघाताच्या चौकशीचे काम सुरू आहे. डीएसपी श्वेताभ भास्कर यांनी सांगितले की, दोन्ही अपघातग्रस्त गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत आणि लेखी तक्रार प्राप्त झाल्यावरच पुढील कारवाई होईल.

पवनदीपने ‘इंडियन आयडल 12’ ची ट्रॉफी आणि ₹25 लाखांची बक्षिसरक्कम जिंकून देशभरात लोकप्रियता मिळवली होती. विशेष म्हणजे, पवनदीपने वयाच्या दुसऱ्या वर्षी तबला वादनाची सुरुवात केली होती. अपघातानंतर त्याचे हॉस्पिटलमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) झपाट्याने व्हायरल झाले आहेत.

Share:

More Posts