Rashmika Mandanna Vijay Deverakonda : दक्षिणी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघेही कायमच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामुळे चर्चेत राहिले आहेत. सध्या अशी चर्चा आहे ती, या दोघांच्या लग्नाची. दोघेही एकमेकांसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
ऑक्टोबर महिन्यात रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. या काळात दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा जोरात पसरल्या होत्या.
जरी अद्याप दोघांनी त्यांच्या नात्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, तरी रश्मिकाची अंगठी आणि त्यांच्या सोशल मीडियावरील संकेत या संबंधाची पुष्टी देतात.
अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे की, हे कपल कधी विवाहबंधनात अडकणार आहे. परंतु, अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका आणि विजय २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिना प्रेमाचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे ही तारीख या कपलसाठी खास ठरेल.
काही अहवालानुसार, दोघांनी लग्नासाठी हेरिटेज प्रॉपर्टीज फायनल केली आहेत. साखरपुड्याप्रमाणे, लग्न सोहळा देखील खूप खासगी स्वरूपात होईल, ज्यात फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील.
लग्नानंतर, रश्मिका आणि विजय हैदराबादमध्ये एक भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित करतील. या रिसेप्शनमध्ये देखील निवडक आणि जवळच्या लोकांनाच आमंत्रण दिले जाणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.
हे देखील वाचा – Air Pollution Across India : संपूर्ण भारतात वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल









