Home / मनोरंजन / ‘ही वैयक्तिक निवड…’, दीपिका पादुकोणच्या 8 तास काम करण्याच्या मागणीबद्दल रेणुका शहाणेंनी व्यक्त केलं मत, म्हणाल्या…

‘ही वैयक्तिक निवड…’, दीपिका पादुकोणच्या 8 तास काम करण्याच्या मागणीबद्दल रेणुका शहाणेंनी व्यक्त केलं मत, म्हणाल्या…

Work Hours In Film Industry | सध्या चित्रपटसृष्टीत कामाच्या तासांवरून मोठी चर्चा सुरू आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने चित्रपटात काम करण्यासाठी...

By: Team Navakal
Work Hours In Film Industry

Work Hours In Film Industry | सध्या चित्रपटसृष्टीत कामाच्या तासांवरून मोठी चर्चा सुरू आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने चित्रपटात काम करण्यासाठी 8 तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. त्यानंतर याबाबत आणखीनच चर्चा सुरू झाली. या मुद्यावर आता अभिनेत्री आणि दिग्दर्शिका रेणुका शहाणे यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे. हा प्रत्येकाच्या वैयक्तिक निवडीचा प्रश्न असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरीट’ चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दीपिकाने चित्रपटात काम करण्यासाठी 8 तासांची अट घातली होती. तेव्हापासून चित्रपटसृष्टीतील कामाच्या तासांचा मुद्दा अधिकच चर्चेत आला.

याविषयी बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या की, “मला यावर सर्वसाधारण विधान करायचे नाही, कारण मला वाटते की काही पुरुष अभिनेत्यांनाही कामाचे तास कमी करायचे असतात, फक्त महिलाच नाही. अनेकांनी समोर येऊन सांगितले आहे की त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. हा प्रत्येकाच्या वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे. ” असे रेणुका शहाणे म्हणाल्या. याबाबत हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, “मी अशा अनेक कामावर असलेल्या महिलांना ओळखते ज्या मालिकांमध्ये 18-तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात आणि त्या आपल्या मुलांना सेटवरच घेऊन जाऊन त्यांचे पालनपोषणकरतात. ही त्यांची निवड आहे आणि त्यावर मी बोलणारी कोण? जर निर्मात्याने ते स्वीकारले, तर तो त्यांचा अधिकारआहे,” असे त्या म्हणाल्या.

रेणुका शहाणे यांच्या मते, 8 तासांचे काम ही मागणी वैयक्तिक गरजेनुसार किंवा इच्छेनुसार असावी, त्यावर कोणतीही सक्ती (नसावी. “काही महिलांना 18 तास काम करायचे असू शकते किंवा त्यांना त्याची गरज असू शकते. ही खूप वैयक्तिक बाब आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच आई झालेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणने संदीप रेड्डी वंगायांच्या ‘स्पिरिट’ (Spirit) या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर बरीच चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाने दररोज ८ तास काम करण्याची मागणी केली होती, तसेच चित्रपटातून मोठे मानधन आणि नफ्यात वाटा मागितला होता. मात्र, निर्मात्यांना तिच्या या अटी मान्य नव्हत्या.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या