Rhea Chakraborty Naagin Dance in Jail: अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. रियाला तुरुंगात देखील जावे लागले होते. आता तिने नुकतेच एका मुलाखतीमध्ये आपला भावनिक प्रवास आणि तुरुंगातील अनुभवांबद्दल खुलासा केला आहे.
जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर पडण्याच्या दिवशी तिने सहकारी महिला कैद्यांसाठी ‘नागीण डान्स’ केल्याचा एक किस्साही तिने सांगितला.
जामीन मिळाल्यावर केला ‘नागीण डान्स’
NDTV ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना रियाने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. ती 28 दिवस तुरुंगात होती. त्यावेळी इतर महिला कैद्यांनी तिला डान्स करण्याची विनंती केली होती.
रियाने सांगितले, “मला जामीन मिळाल्याच्या दिवशी त्यांनी मला डान्स करायला सांगितला. मी विचार केला की, कदाचित पुन्हा त्यांना कधी भेटू शकणार नाही, जर मी त्यांना आनंदाचा एक क्षण देऊ शकले, तर का नाही?”
तिने सांगितले की, त्या तुरुंगातील बहुतेक महिला निरपराध होत्या आणि अत्यंत निराशेने जगत होत्या.
‘त्या घटनेने आमचे आयुष्य कायमचे बदलले’
सर्व आरोपांमधून CBI कडून क्लिन चिट मिळाल्यानंतरही तिला आनंद का झाला नाही, हे सांगताना रिया भावूक झाली. “लोक म्हणाले की, तो तुझ्यामुळे गेला नाही. मला नेहमीच माहीत होते की, मी काहीच चुकीचे केले नव्हते. पण जेव्हा क्लिन चिट मिळाली, तेव्हाही मला आनंद झाला नाही.
मला फक्त माझ्या आई-वडिलांसाठी आणि त्यांच्या प्रतिष्ठेसाठी आनंद झाला. आम्ही आता पूर्वीसारखे मोकळेपणाने जगणारे कुटुंब राहिलो नाही, ते परत येऊ शकत नाही. त्या क्षणाने आमच्या सर्वांचे आयुष्य कायमचे बदलून टाकले,” असेही ती म्हणाली.
सुशांतच्या मृत्यूनंतर लोक फक्त त्यांच्या दुःखात होते, पण त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला सर्वात जास्त वेदना झाल्या, हे लोक विसरले, असेही तिने सांगितले.
हे देखील वाचा – ‘तुमच्यात दम असेल तर…’; निलेश लंकेंचे गोपीचंद पडळकरांना थेट आव्हान









