Home / मनोरंजन / Raja Shivaji Movie: ‘राजा शिवाजी’चा चित्रीकरणाचा टप्पा पूर्ण! रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Raja Shivaji Movie: ‘राजा शिवाजी’चा चित्रीकरणाचा टप्पा पूर्ण! रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Raja Shivaji Movie Riteish Deshmukh : मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरचा सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे चित्रीकरण...

By: Team Navakal
Raja Shivaji Movie
Social + WhatsApp CTA

Raja Shivaji Movie Riteish Deshmukh : मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरचा सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.

गेल्या वर्षभरातील 100 दिवसांच्या कालावधीत वाई, महाबळेश्वर, सातार, मुंबई यांसह अनेक ऐतिहासिक ठिकाणी या सिनेमाचे चित्रीकरण पार पडले. 16 व्या शतकातील महाराष्ट्र हुबेहूब पडद्यावर उभा करण्यासाठी ऐतिहासिक किल्ल्यांचे बारकाईने संशोधन करून भव्य सेट्स उभारण्यात आले होते.

“क्षणभर थांबलेला सूर्य.. मावळतीचा मावळ.. पण क्षणभरासाठीच… उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी,” अशा शब्दांत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या असून महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांना हे सिनेमारूपी अभिवादन असल्याचे त्याने म्हटले आहे.

तगडी स्टारकास्ट आणि विद्या बालनचे ‘सरप्राईज’

या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यामध्ये पाहायला मिळणारी मराठी आणि हिंदीतील दिग्गज कलाकारांची फौज. रितेशने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून, स्टारकास्टमध्ये त्याने अनेक बड्या नावांचा उलगडा केला आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख अशा दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

विशेषतः रितेशने पोस्टमध्ये विद्या बालनला टॅग केल्यामुळे ती या ऐतिहासिक कथेत कोणती महत्त्वाची भूमिका साकारणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या भव्य स्टारकास्टमुळे हा चित्रपट केवळ मराठीच नव्हे, तर भारतीय सिनेसृष्टीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी चिन्हे आहेत.

जागतिक स्तरावर 6 भाषांमध्ये होणार प्रदर्शित

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती असलेला हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्याही अत्यंत प्रगत असणार आहे. यामध्ये आधुनिक व्हीएफएक्स आणि भव्य ॲक्शन दृश्यांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले असून, ही जोडी पुन्हा एकदा आपल्या संगीताने इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी, म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित केला जाणार आहे. हा सिनेमा मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण 6 भाषांमध्ये जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार असून तरुण शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रवासाची कथा सांगणारा हा अनुभव प्रेक्षकांसाठी भावनिक आणि भव्य असेल.

हे देखील वाचा – Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात; सदनिका घोटाळ्यात 2 वर्षांची शिक्षा कायम

Web Title:
संबंधित बातम्या