Home / मनोरंजन / Raja Shivaji Movie Teaser: ‘या’ तारखेला घुमणार स्वराज्याचा सिंहनाद! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा टीझर एकदा पाहाच

Raja Shivaji Movie Teaser: ‘या’ तारखेला घुमणार स्वराज्याचा सिंहनाद! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा टीझर एकदा पाहाच

Raja Shivaji Movie Teaser: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित आणि भव्य ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’चा अंगावर शहारे आणणारा टीझर अखेर प्रदर्शित झाला...

By: Team Navakal
Raja Shivaji Movie
Social + WhatsApp CTA

Raja Shivaji Movie Teaser: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित आणि भव्य ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’चा अंगावर शहारे आणणारा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता रितेश देशमुख याने केवळ या चित्रपटाचे दिग्दर्शनच केले नाही, तर तो स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत पडद्यावर झळकणार आहे.

टीझरमधील रितेशचा लूक आणि महाराजांची जरब पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाचीच चर्चा रंगली आहे.

जेनेलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांची निर्मिती असलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट येत्या 1 मे 2026 रोजी म्हणजेच ‘महाराष्ट्र दिनी’ जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ऐतिहासिक भव्यता आणि दमदार अभिनयामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

दिग्गज कलाकारांची मांदियाळी

या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे त्यातील तगडी स्टारकास्ट. ‘राजा शिवाजी’मध्ये बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. यामध्ये संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रितेशची पत्नी जिनिलीया देशमुख या चित्रपटात महाराणी सईबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे.

स्वराज्याचा देदीप्यमान इतिहास

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्याग, पराक्रम आणि दूरदृष्टी या चित्रपटातून अत्यंत प्रभावीपणे मांडली जाणार आहे. अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आणि स्वराज्याची स्थापना हा प्रवास प्रेक्षकांना एका भव्य सिनेमॅटिक अनुभवाद्वारे पाहायला मिळेल. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीची ही निर्मिती मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अजय-अतुल आणि संतोष सिवन यांची साथ

चित्रपटाच्या तांत्रिक बाजूही तितक्याच भक्कम आहेत. संगीताची धुरा प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी सांभाळली असून, जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार संतोष सिवन या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या कॅमेऱ्यातून साकारलेली महाराजांची शौर्यगाथा पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या