Home / मनोरंजन / सैफ अली खानचे भांडण ! मलायका अरोराचे वॉरंट रद्द

सैफ अली खानचे भांडण ! मलायका अरोराचे वॉरंट रद्द

मुंबई – मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बारा वर्षांपूर्वी अभिनेता सैफ अली खानचे (Saif Ali Khan)एका अनिवासी भारतीयाबरोबर भांडण झाले होते....

By: Team Navakal
saif ali khan and malaika arora case


मुंबई – मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बारा वर्षांपूर्वी अभिनेता सैफ अली खानचे (Saif Ali Khan)एका अनिवासी भारतीयाबरोबर भांडण झाले होते. या प्रकरणी अभिनेत्री मलायका अरोरा (Actor Malaika Arora )ही साक्षीदार असूनही न्यायालयात न आल्याबद्दल तिच्यावर वॉरंट बजावण्यात आला होता. नंतर ती न्यायालयात हजर झाल्याने वॉरंट रद्द (cancelled warrant)करण्यात आले आहे.


सैफ अली खान त्याच्या कुटुंबियांसमवेत २२ फेब्रुवारी २०१२ रोजी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणासाठी गेला होता. तिथे त्याचे अनिवासी भारतीय इक्बाल मिर शर्मा (Iqbal Mir Sharma)यांच्याबरोबर भांडण झाले होते. त्यावेळी मलायका अरोराही या हॉटेलमध्ये होती. पोलिसांनी तिला या प्रकरणी साक्षीदार केले होते. ती तपासकार्यात सहकार्य करत नसल्याचे फिर्यादी पक्षाने न्यायालयात सांगितल्यानंतर न्यायालयाने या वर्षीच्या एप्रिल महिन्यात तिला वॉरंट बजावले होते. यावर मलायका अरोराने न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावून आपल्यावरील वॉरंट रद्द करण्याची मागणी केली . ती न्यायालयात हजर झाल्यामुळे न्यायालयाने तिचे वॉरंट रद्द केले.

Web Title:
संबंधित बातम्या