गोळी न झाडता लढलेली लढाई! सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चे पहिले पोस्टर आले समोर

Battle of Galwan Poster

Battle of Galwan Poster | बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’च्या (Battle of Galwan) फर्स्ट लुक पोस्टरमुळे चर्चेत आहे. रक्ताने माखलेला चेहरा, अभिमानास्पद मिशी आणि डोळ्यांतील देशभक्तीने भरलेली तीव्रता यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून याचित्रपटाची चर्चा होती. अखेर याचे पहिले पोस्ट समोर आले आहे. हा चित्रपट 2020 मधील भारत-चीन सीमेवरील गलवान व्हॅली संघर्षावर आधारित आहे, ज्या लढाईत एकही गोळी न झाडता भारतीय सैनिकांनी अदम्य शौर्य दाखवले.

गलवान संघर्ष आणि चित्रपटाची पार्श्वभूमी

2020 मध्ये लडाखच्या गलवान व्हॅलीत भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेला संघर्ष हा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. समुद्रसपाटीपासून 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर लढलेल्या या लढाईत काठ्या आणि दगडांचा वापर झाला होता, कारण त्या भागात अग्निशस्त्रांना बंदी होती. ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट या ऐतिहासिक लढाईची तीव्रता आणि भारतीय सैनिकांचा अभिमान दर्शवतो. सलमानच्या मोशन पोस्टरने ही भावना अचूकपणे टिपली आहे.

https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1941136337278828625

सलमान खानने या चित्रपटासाठी मोठा शारीरिक बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोत तो सडपातळ आणि फिट दिसत आहे. त्याच्या पोस्टमधील कॅप्शन, “मेहनत करो सही दिशा में. उन्हीं पर वो मेहरबान, और बनाएगा उन्हीं को उनके हुनर का पेहलेवान,” याने चाहत्यांचे लक्ष वेधले.

‘बॅटल ऑफ गलवान’चे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत असून, सलमान खान फिल्म्सद्वारे त्याची निर्मिती होत आहे. हिमेश रेशमिया संगीतकार आहे, तर हर्षिल शाह, अंकुर भाटिया आणि हिरा सोहल्ल यांच्यासह इतर कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत. प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सलमानचा ‘सिकंदर’ चित्रपटात पाहायला मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही. मात्र, ‘बॅटल ऑफ गलवान’च्या फर्स्ट लुकने चाहत्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण केला आहे.