Home / मनोरंजन / Bollywood Security Alert: रणवीर सिंहनंतर आता सलमान खानच्या जवळच्या नातेवाईकाला धमकी! बिश्नोई टोळीचे नाव घेत पाठवला ईमेल

Bollywood Security Alert: रणवीर सिंहनंतर आता सलमान खानच्या जवळच्या नातेवाईकाला धमकी! बिश्नोई टोळीचे नाव घेत पाठवला ईमेल

Bollywood Security Alert: बॉलिवूडमधील कलाकारांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरूच असून, अभिनेता रणवीर सिंहला मिळालेल्या धमकीच्या काही दिवसांतच आता अभिनेता आयुश...

By: Team Navakal
Bollywood Security Alert
Social + WhatsApp CTA

Bollywood Security Alert: बॉलिवूडमधील कलाकारांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरूच असून, अभिनेता रणवीर सिंहला मिळालेल्या धमकीच्या काही दिवसांतच आता अभिनेता आयुश शर्मालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमान खानची बहीण अर्पिता खानचा पती आयुश शर्मा याला एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला.

या मेसेजमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा उल्लेख करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

ओळख लपवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर

तपासात असे समोर आले आहे की, आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी ‘प्रोटॉन मेल’चा (Proton Mail) वापर केला आहे. यापूर्वी रणवीर सिंहला व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉईस नोटद्वारे १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यासाठी व्हीपीएनचा (VPN) वापर करण्यात आला होता. दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींनी आपली ओळख गुपित ठेवण्यासाठी डिजिटल क्लृप्त्या वापरल्या आहेत. या धमक्यांमागे खरोखर बिश्नोई टोळी आहे की इतर कोणी याचा तपास पोलीस करत आहेत.

रणवीर सिंह आणि दीपिकाच्या सुरक्षेत वाढ

खंडणीसाठी आलेल्या धमकीनंतर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. त्यांच्या घराबाहेर सशस्त्र पोलीस आणि खासगी रक्षकांचा पहारा वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या कडक बंदोबस्तामुळे सोसायटीतील इतर रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रारही व्यवस्थापनाने केली आहे.

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर ५ राऊंड गोळीबार झाला होता. या प्रकरणात गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. गोळीबारासाठी वापरलेली गाडी पुणे येथील एका व्यक्तीकडून ३० हजार रुपयांना खरेदी करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ही गाडी जुहूमध्ये एका ठरलेल्या ठिकाणी सोडली होती, जिथून शूटरने ती ताब्यात घेऊन हल्ला केला. या प्रकरणाचा मास्टरमाईंड शुभम लोणकर असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

एकामागून एक चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांना येणाऱ्या या धमक्यांमुळे चित्रपटसृष्टीत दहशतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई पोलीस या टोळीचा नायनाट करण्यासाठी कडक पावले उचलत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या