जीवघेणा ‘ब्रेन एन्युरिझम’! सलमान खानला असलेला गंभीर मेंदूचा आजार काय आहे?

Salman Khan Health

Salman Khan Health | बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने आपल्या गंभीर आरोग्य समस्यांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एपिसोडमध्ये बोलताना सलमानने आपल्या न्यूरोलॉजिकल आजारांबद्दल मोकळेपणाने सांगितले.

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, ब्रेन एन्युरिझम आणि आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशन (AVM) या तीन गंभीर आजारांशी लढत असूनही तो काम करत असल्याचे त्याने सांगितले.

कपिल शर्माच्या शोमध्ये सलमानची मनमोकळी गप्पा

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पहिल्या एपिसोडमध्ये सलमानने आपल्या आजारांबाबत माहिती दिली. “मी रोज हाडं मोडतोय, बरगड्या तुटल्या आहेत, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आहे, मेंदूत एन्युरिझम आहे, AVM आहे, तरीही मी काम करतोय,” असे त्याने सांगितले.

ग्नाबाबत कपिल शर्माने विचारले असता, सलमानने विनोदात म्हटले, “जर बायकोने अर्धे पैसे घेऊन सोडले, तर पुन्हा सुरुवात करण्याची ताकद आता माझ्यात नाही.” यावेळी बोलताना त्याने त्याच्या आजारांबाबत माहिती दिली.

सलमानला नेमके कोणते आजार?

सलमान खानने स्वतः माहिती दिली की त्याला ब्रेन एन्युरिझम, आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशन (AVM) आणि ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या तीन गंभीर आरोग्य समस्या आहेत.

  1. ब्रेन एन्युरिझम (Cerebral Aneurysm)

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड स्ट्रोक (NINDS) नुसार, ब्रेन एन्युरिझम हा मेंदूतील रक्तवाहिनीच्या भिंतीवरील कमकुवत भाग आहे. हा भाग फुगतो व फुटल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो. हा आजार जीवघेणा ठरू शकतो, कारण तो फुटल्यास मेंदूत रक्तस्त्राव (हेमोरेजिक स्ट्रोक) होण्याचा धोका असतो.

  1. आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशन (AVM)

NINDS नुसार, AVM म्हणजे रक्तवाहिन्यांचे असामान्य जाळे, ज्यामुळे धमनी आणि शिरांमधील जोडणी बिघडते. यामुळे रक्तस्त्राव किंवा डोकेदुखी यांसारख्या न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात.

  1. ट्रायजेमिनल न्यूराल्जिया (Trigeminal Neuralgia)

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा चेहऱ्यावर तीव्र वेदना निर्माण करणारा दीर्घकालीन आजार आहे. याला ‘टिक डौलोरेक्स’ असेही म्हणतात. यामुळे चेहऱ्यावर विजेच्या झटक्यासारखी वेदना जाणवते, जी ट्रायजेमिनल मज्जातंतूंमुळे होते. ही वेदना इतकी तीव्र असते की दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो.