Home / मनोरंजन / स्मृती इराणी 15 वर्षांनंतर पुन्हा ‘तुलसी’च्या भूमिकेत! ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधील फर्स्ट लूक आला समोर

स्मृती इराणी 15 वर्षांनंतर पुन्हा ‘तुलसी’च्या भूमिकेत! ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधील फर्स्ट लूक आला समोर

Smriti Irani in Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi | ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Kyunki Saas Bhi Kabhi...

By: Team Navakal
Smriti Irani in Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi

Smriti Irani in Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi | ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) या आयकॉनिक टीव्ही मालिकेच्या रिबूटसह स्मृती इराणी (Smriti Irani) पुन्हा तुलसी विराणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लीक झालेल्या फर्स्ट लूकमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या मालिकेत 15 वर्षांनंतर अभिनयात पुनरागमन करणाऱ्या स्मृती यांच्यासह अमर उपाध्याय मिहिरच्या भूमिकेत परतणार आहेत. बालाजी टेलिफिल्म्सच्या एकता कपूर निर्मित या मालिकेच्या रिबूटने सोशल मीडियावर चर्चा सुरू केली आहे.

स्मृती इराणींचा तुलसी लूक

लीक झालेल्या फर्स्ट लूकमध्ये स्मृती इराणी मरून साडी, जरीची किनार, मोठा लाल बिंदी, पारंपरिक मंदिर दागिने आणि काळ्या मण्यांचे मंगळसूत्र परिधान केलेल्या दिसत आहेत. हा लूक तुलसीच्या आदर्श सूनेच्या प्रतिमेला साजेसा आहे. स्मृतीने इंस्टाग्रामवर मालिकेची 25 वर्षे साजरी करताना लिहिले होते की, “हा शो फक्त मालिका नव्हता, तर एक भावना होता. तुलसीला कुटुंबाचा भाग बनवणाऱ्या प्रत्येक दर्शकाचे धन्यवाद.”

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही 2000 ते 2008 या काळात स्टार प्लसवर प्रसारित झालेली, 1,800 हून अधिक भाग असलेली लोकप्रिय मालिका होती. एकता कपूर निर्मित या शोने स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय यांना घराघरात पोहोचवले.

तुलसी ही पंडिताची मुलगी असून तिचा विवाह व्यावसायिक गोवर्धन विराणी यांच्या नातवाशी (मिहिर) होतो. ही मालिका सहा वर्षे टीआरपीमध्ये अव्वल होती. या मालिकेद्वारे भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासा अनेक नवे बदल पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दरम्यान मालिकेचा रिबूट 3 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु निर्मितीतील विलंबामुळे प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही मालिका कधी सुरू होणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या