Smriti Mandhana Wedding : टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा २३ नोव्हेंबरला रविवारी सांगलीत फार्म हाऊसवर विवाह होणार होता. २० नोव्हेंबरपासून लग्नाच्या विधींना जोरदार सुरुवात देखील झाली. मेहेंदी, संगीतचे देखील कार्यक्रम झाले. परंतु लग्नाच्या काही तास आधी अचानक लग्न सोहळा रद्द झाल्याच्या बातम्यांना उधाण आले. कारण होते स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात येत असल्याच दोन्ही कुटुंबांकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. आणि त्यानंतर वेगळंवेगळ्या चर्चाना उधाण आलं.
नेमकं प्रकरण काय?
रविवारी 23 नोव्हेंबरला सांगलीत भारतीय क्रिकेट टीमची व्हॉइस कॅप्टन स्मृती इराणी मंदाना आणि म्युझिक कंपोजर फिल्म मेकर पलाशच लग्न होणार होतं. सगळी तयारी सुद्धा जोरदार झाली होती. लग्नाला कोणते पावणे येणार याची चर्चा होती, त्यानंतर संगीत देखील जोरदार पार पडलं, हळद देखील दणक्यात पार पडली. पण रविवारी दुपारी फेरी होण्याच्या आधी स्मृतीच्या सांगलीच्या फार्म हाऊस मध्ये एक ॲम्बुलन्स दाखल झाले आणि त्यातून स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल. स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला असून त्यांची तब्येत जोपर्यंत ठीक होत नाही तोवर स्मृती आणि पलाशच लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं. जोवर आपले वडील आपल्या बाजूला उभे राहत नाहीत तोवर आपण लग्न करणार नाही असा निर्णय स्मृतीने घेतला अशा बातम्या देखील माध्यमांवर आल्या होत्या.
स्मृतीच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्मृतीच्या वडिलांना नेमका काय त्रास झाला हे सांगितलं त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणं सोबतच स्मृतीच्या लग्नाच्या इव्हेंट मॅनेजरने सुद्धा लग्न पुढे ढकलण्यात आल आहे स्मृतीच्या वडिलांचे तब्येत धोक्या बाहेर असले तरी ते पूर्णपणे ठीक नसल्याने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे मीडियाच्या समोर येऊन स्पष्ट केलं हे सगळं घडलं दुपारी त्यानंतर संध्याकाळी आणखी एक बातमी समोर आली कि स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याची तब्येत बिघडली असून त्यालाही सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील आणि पलाश या दोघांची तब्येत बिघडल्याने आणि लग्न नेमकं कधी होणार हे समोर येत नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल.
त्यात अजूनही दोघांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नव्हती पण मग त्यानंतर पलाशच्या आईने माध्यमांशी बोलताना काही खुलासा केले की पलाश स्मृतीच्या वडिलांच्या खूप क्लोज आहेत कृतीपेक्षा हे दोघे जास्त क्लोज आहेत जेव्हा ते आजारी पडले तेव्हा स्मृतीच्या आधीच पालाशने डिसिजन घेतला की जोपर्यंत वडील ठीक होत नाहीत तोपर्यंत मी लग्न करणार नाही. हळदीचा कार्यक्रम झाला होता त्यामुळे आम्ही पलाशला बाहेर जाऊ देत नव्हतो पण रडून रडून त्याची तब्येत खराब झाली इतकी की त्याला चार तास हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले. द्यावी लागली
हे देखील वाचा –
UNESCO : गौरवास्पद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे युनेस्कोच्या मुख्यालयात अनावरण









