Thamma movie Collection: दिवाळीच्या मुहूर्तावर मॅडॉक फिल्म्सने चाहत्यांना हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘थामा’ची (Thamma) भेट दिली आहे. 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे.
Thamma movie Collection: पहिल्या दिवसाचे कलेक्शन
Sacnilk च्या ताज्या आकडेवारीनुसार, ‘थामा’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीतब्बल 24.87 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ‘एक दिवाने की दिवानियत’ वगळता या चित्रपटाला मोठी स्पर्धा नव्हती.
यापूर्वी वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याला कन्नड चित्रपट ‘कांतारा चॅप्टर 1’ कडून तीव्र स्पर्धा मिळाली होती.
मागील चित्रपटांपेक्षा ‘थामा’ मागे
मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील मागील चित्रपटांच्या तुलनेत ‘थामा’ची ओपनिंग थोडी कमी राहिली आहे.
मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री 2’ ने पहिल्या दिवशी 35 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. त्यापूर्वीच्या दिवाळीत प्रदर्शित झालेल्या कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ नेही 32 कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘थामा’ चित्रपटाबद्दल…
‘थामा’ हा ‘स्त्री’, ‘भेडिया’ आणि ‘मुंज्या’ नंतर मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील 5 वा चित्रपट आहे. या चित्रपटात व्हॅम्पायर्सची कथा दाखवण्यात आली आहे. आयुष्मान खुरानाचा ‘थामा’ हा पडद्यावरचा अवतार पूर्णपणे वेगळा आहे. या चित्रपटाची कथा ‘रक्तबीज’ या पौराणिक कथेभोवती फिरते.
युनिव्हर्समध्ये नवी एन्ट्री!
याचदरम्यान मॅडॉक फिल्म्सने त्यांच्या युनिव्हर्समधील आगामी चित्रपट ‘शक्ती शालिनी’ बद्दल मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटात अनित पड्डा मुख्य भूमिकेत असेल, हे निश्चित झाले आहे. यापूर्वी कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत असल्याची चर्चा होती. ‘शक्ती शालिनी’ आता 24 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होईल.
हे देखील वाचा – Asia Cup Trophy Controversy: ‘भारताला आशिया कपची ट्रॉफी हवी असेल तर…’; उद्धट नक्वींनी BCCI समोर ठेवली नवीन अट