Home / मनोरंजन / ‘वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण’; विवेक अग्निहोत्रींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद, मराठी कलाकारांनी व्यक्त केला संताप

‘वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण’; विवेक अग्निहोत्रींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद, मराठी कलाकारांनी व्यक्त केला संताप

Vivek Agnihotri Marathi food controversy

Vivek Agnihotri Marathi food controversy: ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटांमुळे चर्चेत असलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri Marathi food controversy) एका वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

एका मुलाखतीदरम्यान त्यांनी मराठी पदार्थांची खिल्ली उडवल्याने सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

एका मुलाखतीत अग्निहोत्री म्हणाले की, लग्नानंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी जेव्हा त्यांच्यासाठी वरण भात (Varan Bhat) बनवला, तेव्हा त्यांनी ‘हे तर गरिबांचे जेवण’ असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, दिल्लीत ते तेलकट पदार्थ खात असल्यामुळे, त्यांना वरण भात एकदम साधा वाटला.

हे बोलताना ते हसत होते, तर पल्लवी जोशीही हसताना दिसल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे आणि देहबोलीमुळे मराठी प्रेक्षक संतप्त झाले असून, अनेक मराठी कलाकारांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महेश टिळेकर आणि पुष्कर जोग यांचा संताप

मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून अग्निहोत्री आणि त्यांच्या पत्नीवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले, “ज्या मराठी नेत्यांनी ‘कश्मीर फाइल्स’चे मोफत शो आयोजित करून विवेक अग्निहोत्रीला आर्थिक हातभार लावला, त्याच अग्निहोत्रीने ‘मराठी जेवण गरिबांचे’ म्हटल्यावर तुम्ही गप्प का?” त्यांनी पल्लवी जोशी यांनाही टोला लगावला, “नवरा मराठीची इज्जत काढत असताना शेजारी दात विचकत बसलेल्या पल्लवी जोशीला ‘साडी-चोळी असा माहेरचा आहेर’ देऊन सत्कार करणार का?”

अभिनेता पुष्कर जोग यांनीही इन्स्टाग्रामवर आपली नाराजी व्यक्त केली. “सगळे महाराष्ट्रात येतात, पैसे कमावतात, पण मराठीला मान देत नाहीत. यावर कोणीच काही बोलत नाही,” असे म्हणत त्यांनी या विधानाचा जाहीर निषेध केला.

“एवढी गरीबी आहे म्हणूनच अख्ख्या देशाचा भार मुंबई आणि महाराष्ट्राने उचलला आहे,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. दरम्यान, अग्निहोत्री यांनी खाद्यपदार्थांवर टीका केल्याने नेटिकऱ्यांनीनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

हे देखील वाचा –

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान एका व्यक्तीने मारली कानशिलात

सरकारचा मोठा निर्णय; लवकरच ऑनलाइन गेमिंगवर बंदी येणार? जाणून घ्या काय आहे नवीन विधेयक

युद्ध सुरू असतानाच झेलेन्स्की थेट शत्रूच्या देशात जाणार? शांतता चर्चेसाठी पुतीन यांचा रशियाला येण्याचा प्रस्ताव

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता? हवामान विभागाचा अलर्ट जारी

Share:

More Posts