Home / मनोरंजन / 800 साड्या घेऊन ‘बिग बॉस 19’ मध्ये आलेली तान्या मित्तल कोण आहे? जाणून घ्या

800 साड्या घेऊन ‘बिग बॉस 19’ मध्ये आलेली तान्या मित्तल कोण आहे? जाणून घ्या

Tanya Mittal Bigg Boss 19

Tanya Mittal Bigg Boss 19: बिग बॉस 19′ मधील स्पर्धक तान्या मित्तल (Tanya Mittal) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अवघ्या 26 वर्षांच्या या तरुण उद्योजिका, इन्फ्लुएंसर आणि ब्युटी क्वीनने आपल्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Tanya Mittal Net Worth)

‘बिग बॉस’च्या घरात 800 साड्या घेऊन आलेली ही स्पर्धक तिच्या वादग्रस्त विधानांसाठीही ओळखली जाते. तान्या मित्त कोण आहे? जाणून घेऊया.

शिक्षण ते व्यवसाय असा प्रवास (Tanya Mittal biography)

27 सप्टेंबर 2000 रोजी ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या तान्याने वयाच्या 18 व्या वर्षी सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये लेबनॉन येथे ‘मिस एशिया टुरिझम’चा किताब जिंकून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. आर्किटेक्चरची पदवी घेतल्यानंतरही तिने नोकरी न करता उद्योजक बनण्याचा निर्णय घेतला.

केवळ 500 रुपयांच्या भांडवलावर तिने ‘हँडमेड लव्ह बाय तान्या’ हा ब्रँड सुरू केला होता. आज तिच्याकडे 2.5 मिलियनहून अधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत आणि ती तिच्या व्यवसायातून दरमहा सुमारे 6 लाख रुपये कमावते.

तिची एकूण संपत्ती 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे ती ‘बिग बॉस’च्या इतिहासातील सर्वात तरुण आणि श्रीमंत स्पर्धकांपैकी एक बनली आहे.

समाजसेवा आणि ‘बॉस’ व्यक्तिमत्व

आपल्या ग्लॅमरस प्रतिमेसोबतच तान्या समाजकार्यातही सक्रिय आहे. ती ‘ब्लिस फाऊंडेशन’ची असोसिएट डायरेक्टर आहे आणि ‘गर्ल अप’ व ‘पिंक लीगल’ यांसारख्या संस्थांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करते.

तिने ग्वाल्हेरजवळ एक गाव दत्तक घेतले असून तेथील दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात ती स्वतःला ‘मॅडम’ किंवा ‘बॉस’ म्हणवून घेण्याचा आग्रह करते, ज्यामुळे तिचे हे खास व्यक्तिमत्व आणखी ठळक होते.

प्रयागराज कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची कहाणी

तान्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि दुर्दैवी प्रसंग 29 जानेवारी 2025 रोजी प्रयागराज महाकुंभामध्ये घडला. येथे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ती स्वतः अडकली होती, ज्यात 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

एका मुलाखतीत तिने तो अनुभव सांगताना, त्या गोंधळात महिला आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न कसा केला, हे सांगितले. “माझा ‘बॉस’ स्वभावही त्या क्षणी हतबल झाला होता,” असे म्हणत तिने तो क्षण आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण असल्याचे म्हटले होते. दरम्यान, बिग बॉस 19 च्या पर्वात तान्या पहिल्याच आठवड्यात आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत आली आहे.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ChatGPT vs Perplexity vs Gemini vs Grok: कोणते AI मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट? किती आहे सबस्क्रिप्शन शुल्क? वाचा

‘Trump is dead’ ट्रेंडमुळे सोशल मीडियावर खळबळ, ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा कशी पसरली? जाणून घ्या