मुंबई – अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील स्टेलर बंगले येथील क्रॉस रोड क्रमांक दोनवरील बंगला क्रमांक ११ मध्ये आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास आग लागली होती. ही आग सुरुवातीला तळमजल्यावर लागली. नंतर ती पहिल्या मजल्यावर पसरत गेली. घटनेची महिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, एक रुग्णवाहिका, अदानी वीज वितरणचे कर्मचारी आणि मुंबई महापालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
