अंधेरी पुलाच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांचा खर्च

मुंबई

पश्चिम द्रुतगती महमार्गावरील अंधेरी पूर्व येथील उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. एमएमआरडीएच्या अखत्यारितील पुलांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी राज्य सरकारने मुंबई महापालिकेवर सोपवली आहे. पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पुलांचे आयआयटी मुंबईकडून ऑडिट करण्यात आले. आयआयटीच्या अहवालानुसार पुलाची देखभाल दुरुस्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे . त्यानुसार अंधेरी येथील पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

एमएमआरडीएने फेब्रुवारी २००४ मध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गवरील अंधेरी उड्डाणपूल ते जेव्हीएलआर जंक्शनपर्यंतच्या डांबरीकरणाच्या कामांसाठी सुमारे २४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. एमएमआरडीने या पुलाच्या डांबरीकरणाची कामे केली. परंतु या पुलाच्या दुरुस्तीवर कोणत्याही प्रकारचा खर्च केला नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. एमएमआरडीएकडून हा पूल ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेच्या पूल विभागाच्या वतीने नियुक्त केलेल्या आयआयटी मुंबईकडून या पुलाचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेनंतर पुलाची बेअरिंगसह अन्य प्रकारची कामे कंत्राटदाराने सुचवली आहेत. उड्डाणपूलाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने १ एप्रिल २०२४ रोजी निविदा मागवली. त्यानुसार आता या निविदेनुसार पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top