अतिमसालेदार चिप्समुळे मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

वॉशिंग्टन

अमेरिकेतील मॅसॅच्युसेटमधील एका १४ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. हॅरिस वोलोबा असे त्याचे नाव आहे. त्याने सप्टेंबर २०२३ मध्ये “वन चिप चॅलेंज” या सोशल मीडियावरील स्पर्धेत भाग घेतला होता. यात त्याने कॅरोलिना रीपर आणि नागा वायपर या अतितिखट मिरचीने तयार केलेले चिप्स खाल्ले होते. त्याचा शवविच्छेदन अहवाल आता उघकीस आला. यात अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शवविच्छेदन अहवाल तयार करणाऱ्या मुख्य वैद्यकीय परीक्षकांनी निष्कर्ष काढला की, हॅरिसने मिरचीचा अर्क अति प्रमाण असलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या निधनानंतर काही दिवसांनी पॅकी कंपनीने त्यांच्या दुकानातून हे उत्पादन हटवले होते. याच्या एका पॅकेटची किंमत १० डॉलर आहे. दरम्यान अनेकांनी सोशल मीडिया अकाउंटवरून दावा केला आहे की, या चॅलेंजमुळे कॅलिफोर्नियातील तीन तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मिनेसोटामध्ये आणखी सात जण आजारी पडले आहेत. पॅकी कंपनीने हॅरिसच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top