Home / News / अनंतनाग जेलसह अनेक ठिकाणी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या धाडी

अनंतनाग जेलसह अनेक ठिकाणी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या धाडी

श्रीनगर – जम्मू काश्मीर पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंस काश्मीर (सीआयके) पथकाने दहशतवादाशी संबंधित तपासात एका जेलसह तीन ठिकाणी छापे टाकले. दक्षिण...

By: E-Paper Navakal

श्रीनगर – जम्मू काश्मीर पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंस काश्मीर (सीआयके) पथकाने दहशतवादाशी संबंधित तपासात एका जेलसह तीन ठिकाणी छापे टाकले. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथील जिल्हा कारागृह आणि कुलगाममधील सरकारचे समर्थक मिलिशिया कमांडरच्या घरासह अनेक ठिकाणी छापेमारी केली. सक्षम न्यायालयाकडून मिळालेल्या वॉरंटच्या आधारे हे छापे टाकले .
सीआयके पथकाने अनंतनाग येथील जिल्हा कारागृह मत्तनमध्ये पोहोचून जिल्हा कारागृहातील विविध ब्लॉक आणि बॅरेकची झडती घेतली. यात त्यांनी सेलफोन आणि टॅब्लेटसह इतर ६-८ डिजिटल उपकरणे जप्त केली. या तपासादरम्यान आढळून आले की दहशतवादी नेते जिल्हा कारागृहातून दहशतवादाशी संबंधित कारवायांसाठी काम करत होते .

Web Title:
संबंधित बातम्या