मुंबई- चेंबूरच्या घाटले परिसरातील अनंत मित्र मंडळ आणि खारदेवनगर मयुरेश्वर प्रतिष्ठान या दोन्ही सामाजिक मंडळांच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदा उद्या मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी माधी गणेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोदिन करण्यात आले आहेत.
या गणेश जयंती उत्सवानिमित्त अनंत मित्र मंडळातर्फे आतापर्यंत विविध स्पर्धा,मंगळागौर कार्यक्रम आणि शक्तितुरा सामना आदी कार्यक्रम पार पडले.तर उद्या १३ फेब्रुवारी रोजी श्री गणेश याग, अभिषेक,होमहवन,दीप आरती आणि १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वाटप व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे.तर खारदेवनगर मयुरेश्वर प्रतिष्ठानतर्फे आज १२ फेब्रुवारी रोजी श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यातआली.उद्या १३ फेब्रुवारीला श्रीं ची प्राणप्रतिष्ठा,महापूजा,भजन आणि १४ जानेवारीला महाप्रसाद आणि १५ जानेवारीला विसर्जन मिरवणूक निघणार आहे. तरी परिसरातील भाविकांनी या दोन्ही मंडळाच्या उत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन अनंत मित्र मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ पवार आणि मयुरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष यादव यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.