अबुधाबी मंदिर भाविकांना खुले भाविकांसाठी कडक ड्रेसकोड

अबुधाबी –
संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबीतील पहिले हिंदू मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. मंदिर व्यवस्थापनाने वेबसाइटवर मंदिरात दर्शनार्थींसाठी कडक ड्रेसकोड जारी केला असून वेशभूषेपासून फोटो व व्हिडियोग्राफीपर्यंतचे नियमही यात देण्यात आले आहेत .
मंदिरात भाविकांना मान, कोपर व घोट्यांमधील शरीराचा भाग झाकावा लागेल. याशिवाय मंदिरात आक्षेपार्ह डिझाइन असलेल्या टोप्या, कॅप्स, टीशर्ट्स, जीन्स आणि घट्ट कपड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मंदिरात जाळीच्या किंवा सी-थ्रू अशा प्रकारच्या कपड्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. पाळीव प्राण्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिर परिसरात खाद्यपदार्थ व पेये नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांनाही मनाई करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top