अभाविपच्या अध्यक्षपदी पुन्हा राजशरण शाहींची नियुक्ती

नवी दिल्ली – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी राजशरण शाही आणि सरचिटणीसपदी याज्ञवल्क्य शुक्ल यांची नियुक्ती केली आहे.२०२३-२४ या एक वर्षासाठी ही फेरनिवड करण्यात आली आहे.
मुंबईतील अभाविपच्या केंद्रीय कार्यालयातून ही घोषणा करण्यात आली. अभाविपच्या मध्यवर्ती कार्यालयातून निवडणूक अधिकारी डॉ.सी.एन.पटेल यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही पदांचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल आणि दोन्ही अधिकारी ७ ते १० डिसेंबर दरम्यान दिल्लीत होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय अधिवेशनात पदभार स्वीकारतील. राजशरण शाही हे गोरखपूर जिल्ह्यातील आहेत. त्यांचे शिक्षण अध्यापनशास्त्रात पीएचडीपर्यंत आहे.सध्या ते बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ येथे शिक्षण विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.आतापर्यंत सहा पुस्तकांचे लेखन आणि संपादन केले आहे. याज्ञवल्क्य शुक्ल हे मूळचे झारखंडमधील गढ़वा जिल्ह्यातील आहेत. रांची विद्यापीठातून भूगोल विषयात पीएचडीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top