अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन आज इस्रायलला भेट देणार

वॉशिंग्टन :

इस्रायल-हमास युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उद्या इस्रायलमधील तेल अवीवला भेट देणार आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी ही माहिती दिली.आज पहाटे तेल अवीवमध्ये माध्यमांना संबोधित करताना ब्लिंकन म्हणाले की, इस्रायल, मध्य पूर्व आणि जगासाठी हा अतिशय महत्वाचा क्षण आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष बायडन उद्या इस्रायलला भेट देणार आहेत.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री, अँटोनी ब्लिंकन यांनी सांगितले की, “इस्रायला पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन तेल अवीवला भेट देणार आहेत. त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष बायडन पुन्हा स्पष्ट करतील की इस्रायलला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा आणि हमास आणि इतर दहशतवादी संघटनांकडून होणारे हल्ले थांबवण्याचा पूर्ण अधिकार आहे. अमेरिका आणि इस्रायलने एक यंत्रणा तयार करण्यास सहमती दर्शविली आहे. ज्यामुळे इतर देश आणि बहुपक्षीय संस्था गाझामधील नागरिकांना मानवतावादी मदत पोहोचवू शकतील. जे देश या संकटाचा फायदा घेऊन इस्रायलवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना तसे करू नका, असे आवाहन बायडन करणार आहेत. हमासने ओलीस ठेवलेल्यांची सुटका करण्यासाठी बायडन अमेरिकेच्या भागीदारांशी समन्वय साधत राहतील.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top